कल्याण-डोबिंवलीनंतर आता धारावीत ओमायक्रॉनचा रूग्ण?
धारावीमध्येही ओमायक्रोनचं सावट असल्याची चिंता व्यक्त करण्यात येतेय.
मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन व्हेरिएंट संपूर्ण जगाचा चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटने देशात एन्ट्री केली असून महाराष्ट्रात देखील याचा एक रूग्ण बाधित आढळला आहे. तर आता धारावीमध्येही ओमायक्रोनचं सावट असल्याची चिंता व्यक्त करण्यात येतेय.
पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक व्यक्ती धारावीमध्ये राहतो. दरम्यान या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय. या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.
कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका ओळखता या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सध्या सुरु आहे.