रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की, मधुमेहाचा धोका संभवतो. वाढत्या ताणतणावामुळे देखील मधुमेह होण्यास कारणीभूत ठरतो. बऱ्याचदा मधुमेह झालेल्या रुग्णाची अशी तक्रार असते की सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. ही समस्या सतत होत असल्यास याचा गंभीर परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. सकाळच्या वेळी रक्तातील शुगर वाढत असल्यास सकाळचा आहार कसा असावा ? हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅव्होकॅडो
अ‍ॅव्होकॅडोमध्ये अ‍ॅंटीऑक्सीडेंट्सची मात्रा मुबलक प्रमाणात असते. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे रक्तातील शुगर वाढण्याची शक्यता असते.अ‍ॅव्होकॅडोमध्ये असलेल्या अ‍ॅंटीऑक्सीडेंट्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे जर तुमच्या रक्तातील शुगर वाढत असेल तर सकाळच्या नाश्त्यात अ‍ॅव्होकॅडोचा समावेश नक्की करा. या व्यतिरिक्त ग्लायसेमिक इंडेक्स, फायबर आणि फॅटी अ‍ॅसिड हे मधुमेहाप्रमाणेच हृदयविकार आणि स्ट्रोक सारख्या आजारांवर फायदेशीर ठरतं. 


 मासे खाणे 
मधुमेहाच्या रुग्णांनी मासे खाणं टाळावं असं बऱ्याचदा सांगितलं जातं. खरं सांगायचं तर माश्यांमध्ये प्रोटीनचा मात्रा मुबलक असते.  त्याचप्रमाणे  ओमेगा 3 आणि व्हिटामीन डी जीवनसत्व असल्याने शरीराला भरपूर पोषणतत्व मिळतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात माश्यांचा समावेश करावा असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. 


लसूण 
लसूण रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत करतं. स्वयंपाक घरात अगदी सहजपणे मिळणारा लसूण आरोग्यासाठी गुणकारी मानलं जातं.  रोज सकाळी लसूण खाल्याने अनेक छोट्या मोठ्या आजांवर फायदेशीर ठरतं. 


अ‍ॅप्पल साईड विनेगर 
अ‍ॅप्पल साईड विनेगर शरीरातील शुगर वाढणाऱ्या घटकांना नियंत्रित ठेवतं. रोज 20ML अ‍ॅप्पल साईड विनेगर पाण्यात मिसळून सेवन केल्यास रक्तातील शुगर वाढत नाही. 


 बदाम 
मधुमेहाच्या रुग्णांना हाय प्रोटीनची गरज असते.  बदामात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शुगर हाय होण्याचा धोका टळतो. रोज बदामाचं सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.


चिया सीड्स 
चिया सिड्समध्ये असलेल्या पोषकत्वांमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. यात असलेल्या  फायबर, हेल्दी फॅट्स, ओमेगा -3, कॅल्शिअम आणि अ‍ॅंटीऑक्सीडेंटमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी
ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. तज्ञांच्या सल्ल्यानुसार ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरीच्या सेवनाने अतिउच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहाची समस्या दूर होते. 


( येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)