Worst Fruits For Diabetes​ in Marathi: डायबिटीज रुग्णांनी काळजी घेतली नाही तर तुमची शुगर वाढली म्हणून समजा. शुगर पातळी कमी करायची असेल तर डायबिटीज रुग्णांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच तुमच्या जीवनशैलीत बदल करण्यासोबतच योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहाराचा विचार केला तर फळे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र, अशी काही फळे आहेत जी खाल्ल्यास डायबिटीज  रुग्णांसाठी 'विष' ठरु शकतात. डायबिटीज रुग्णांनी कोणती ही फळे कधीही खाऊ नयेत असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.


शुगर रुग्णांनी आजपासून ही फळे खाणे सोडून द्यावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. अननस  
शुगर असणाऱ्यांनी अननस खाऊ नये. अननसाचा गोडवा अनेकांना आकर्षित करतो, पण त्यात असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी शत्रूपेक्षा कमी नाही. डायबिटीज रुग्णांनी अननस ही खाऊ नये. अन्यथा रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढू शकते.


2. कलिंगड
कलिंगडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. या रसाळ आणि चवदार फळामध्ये साखरेचे प्रमाण असल्याने ग्लायसेमिक इंडेक्स स्कोअर (76) जास्त आहे. म्हणूनच डायबिटीजच्या रुग्णांनी कलिंगड अर्थवा टरबूजाचे सेवन कमीत कमी करावे, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढेल, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो.


3. आंबा  


आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. मात्र, शुगरच्या लोकांनी आंबा खाऊ नये. आंबो गोड पदार्थ असून त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शुगर असणाऱ्यांची तापळी वाढू शकते. आंबा एक असे फळ आहे ज्याची चव फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे, या फळाचा आस्वाद घेण्यासाठी लोक विशेषतः उन्हाळ्याची वाट पाहतात, परंतु डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे अजिबात चांगले नाही, कारण त्यात साखर असते. 


4. केळी  
केळी हे फळ सर्व सिझनमध्ये उपलब्ध असते. केळे हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते, परंतु डायबिटीजच्या रुग्णांसाठी ते धोकादायक आहे, कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स स्कोर (62) आहे जो त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणारे आहे.


5. लिची 
लिचीमध्ये गोडवा आहे. काही लोकांना लिची खायला खूप आवडते, परंतु त्यात 16 ग्रॅम साखर असते, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ डायबिटीज रुग्णांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)