Dicephalic Parapagus Causes :  आई होणं हे या जगातील सर्वात मोठं सुख असतं. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला सुदृढ, स्वस्थ आणि निरोगी बाळ जन्माला यावं. पण नुकतच भारतात एक असं मुलं जन्माला आलं आहे, त्याला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. या मुलाबद्दल ऐकून तुम्ही पण आर्श्चयचकित व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिन आणि सोहेल खान यांना जुळी मुलं होणार आहे असं, सांगण्यात आलं होतं. पण जेव्हा शाहिनची डिलिव्हरी झाली तेव्हा डॉक्टरांसह मॅटरनिटी वॉर्डमधील प्रत्येकाचे डोळे चक्रावले. शाहिनला असं बाळ जन्माला आलं होतं की, ज्याला दोन डोके, तीन हात आणि दो हृदय होते. ही घटना मध्यप्रदेशातील रतलाममधील घडली आहे. या मुलाच्या जन्मानंतर त्याला त्वरित पुढील उपचारासाठी इंदुरला जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र शाहिन आणि सोहेलने या बाळाला जिल्हा रुग्णालयातच ठेवलं आहे. 


डॉक्टरांच्यानुसार या बाळाला डायसेफॅलिक पॅराकॅगस नावाचा आजार आहे. तसंच हे मेडिकल इतिहासातील सगळ्यात दुर्मिळ प्रकरण आहे. अशी मुलं जास्त दिवस जिंवत राहत नाही. जोडलेली मुलं का जन्माला येतात आणि यामागची काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊयात 


काय आहे डायसेफॅलिक पॅराकॅगस आजार?


डायसेफॅलिक पॅराफॅगस या आजारात एकाच शरीरावर दोन डोक्यांसह आंशिक जुळलेलं बाळ हे एक दुर्मिळ प्रकार आहे. अशा मुलांना सामान्य स्वरुपात दोन डोकाचे बाळ म्हणतात. अशा बाळांचा जन्मानंतर लगेचच किंवा काही दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो. अशा मुलांची जगण्याची शक्यता खूप कमी असते.  मेयो क्लिनिकनुसार अशी जोडलेल्या जुळ्या मुलांचे पेल्विस, पोट आणि छाती एकत्र जोडलेली असतात. मात्र त्यांची डोकी वेगळी असतात. या जुळ्यांना दोन, तीन किंवा चार पाय असू शकतात. या मुलांचे शारिरीक अंग अनेक वेळा एकच असतात आणि कधीतरी ते वेगळे असतात. अशा जुळ्या मुलांना वेगळं करण्यात डॉक्टरांना यश आले आहे, असे अनेक प्रकरण आहेत. मात्र अशा ऑपरेशनचं यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. याशिवाय या मुलांचे कुठले अंग एकमेकांना जुळी आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 


काय आहे लक्षणं?


या आजाराबद्दल कुठल्याही प्रकारची लक्षणं हे मुलं जन्माला येईपर्यंत दिसत नाहीत. मात्र जुळी मुलं होणार, येवढंच आपल्याला समजतं. त्याशिवाय महिलांना गरोदरपणामध्ये सुरुवातीच्या दिवसात थकवा, चक्कर येणे आणि उलटी सारखे सामन्य त्रास जाणवतात. गरोदरपणाच्या सुरुवातीला अल्ट्रासाऊंडद्वारे अशा जुळ्या मुलांबद्दल समजू शकतं. 


कसे जन्माला येतात जोडलेली जुळी मुलं?


जोडलेल्या जुळ्या मुलांचे वर्गीकरण सामान्यत: ते कुठून जुळली आहे यावर आधारीत आहे. अशी मुलं शरीराच्या कुठल्याही भागापासून जुळलेली असू शकतात. गर्भधारणेच्या काही आठवड्यानंतर फर्टिलाइज्ड अंडी दोन वेग-वेगळा स्वतंत्र भ्रूणांमध्ये विभाजित होतात. त्यानंतर त्यांचे अवयव तयार होण्याचे काम सुरु होते. जेव्हा अचानक अवयव तयार होण्याचे काम थांबते अशावेळी जोडलेल्या जुळ्या बाळाचा जन्म होतो.