दिवाळीत गोडधोड मिठाई खाल्ली? अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी `हे` डिटॉक्स वॉटर उपयोगी पडेल
आज आम्ही तुमच्यासाठी डिटॉक्स वॉटरची रेसिपी सांगणार आहोत.
मुंबई : दिवाळीचा सण सुरु झालाय. या दिवसांत आपल्या प्रत्येकाच्या घरात मिठाई असते. नकळत आपण इतके गोड पदार्थ खातो की, आपल्याला समजत नाही. आजूबाजूला अनेक चविष्ट मिठाई पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अशावेळी आपण स्वतःला मिठाई चाखण्यापासून रोखू शकत नाही.
एक एक करून आपण नेहमीपेक्षा जास्त गोड खातो. अशा स्थितीत आपल्या जिभेला चव राहते पण तब्येत बिघडण्याची भीती असतेच. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी डिटॉक्स वॉटरची रेसिपी सांगणार आहोत. या पाण्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यानंतर तुम्ही दिवाळीच्या काळात मनसोक्तपणे गोड पदार्थ खाऊ शकता.
डिटॉक्स वॉटरचं साहित्य?
लेमन डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी प्रथम आपण एक मोठे लिंबू घ्या त्यानंतर काकडी, 20 बर्फाचे तुकडे, 4 ग्लास पाणी घ्या.
कसं कराल हे डिटॉक्स वॉटर?
लिंबू आणि काकडीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी प्रथम लिंबाचे तुकडे करा. लिंबानंतर काकडीचेही तुकडे करा. हे तुकडे दोन्ही एका भांड्यामध्ये आणि पाणी घालून त्यात बर्फाचे तुकडे मिसळा. हे रात्रभर ठेवलं तर त्याची चव अजून चांगली होते. जर तुम्ही दररोज 1 ग्लास प्याल पाणी प्याल तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात.