मुंबई : गेल्या दोन वर्षात ऑनलाइन फ्रॉड आणि नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढलं आहे. हॅकर्स किंवा चोर आता वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. वाढत्या कोरोनामुळे एकीकडे बुस्टर डोससाठी सर्वजण आतूरतेनं वाट पाहात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुस्टर डोससाठी तुम्हाला जर कोणता कॉल आला असेल तर सावधान! कारण तुमचं नुकसान होऊ शकतं. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आल्यानंतर सरकारनं बुस्टर डोसबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर फ्री बुस्टर व्हॅक्सिनेशन टेलिफोन कॉल स्कॅमला सुरुवात झाली आहे. 
नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी न पडता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. काय आहे या टोळीची मोडस ऑपरेंडी,काय आहे  जाणून घेऊया. 


या टोळीची नक्की मोडस ऑपरेंडी काय?


कॉल करणारा व्यक्ती नागरिकांना दोन्ही व्हॅक्सिनेशन पूर्ण झाल्या असं सांगतो
विश्वास बसावा म्हणून व्हॅक्सिनेशन घेतलेल्या तारखा आणि केंद्र याची खरी माहिती देतो. 
तिसरा डोस घेण्यात म्हणजेच फ्री बुस्टर डोस घेण्यास स्वारस्य आहे का असं विचारलं जातं.
जो डोस या बुस्टर डोससाठी आपण फोन कॉलवर नोंदणी करु शकता.


 



जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला हा बुस्टर डोस देण्यात येईल असं पुढे सांगितलं जातं. मोबाईलवर एक ओटीपी येतो. काही वेळातच ओटीपी घेण्यासाठी एक कॉल येतो. हा ओटीपी देताच खात्यातून मोठी रक्कम ऑनलाईन चोरी केली जाते.