लंडन : अनेकदा आपण लहान सहान गोष्टी विसरतो. या विसरभोळेपणामुळे नुकसान होतो त्यामधून आपल्याला स्वतःवरच राग येतो. विस्मृती हे तुम्हांला सुरूवातीला लहान वाटत असले तरीही अल्झायमरची सुरूवात असू शकते. आहारात बदल केल्यास तुमचा विस्मृतीचा त्रास कमी करता येऊ शकतो. 


आहारात कोणत्या पदार्थांचा कराल समावेश ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोमॅटो - 


टोमॅटोमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. नियमित त्याचा सलाडमध्ये समावेश केल्यास स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. 


किसमिस- 


मनुका म्हणजेच किशमिशीमध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात. यामुळे मेंदूचं आरोग्य जपायला मदत होते. याकरिता नियमित सकाळी 15-20  किसमिस पाण्यात भिजवून खावेत. यामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. हद्याचे कार्य सुधारते.  


भोपळ्याच्या बीया - 


भोपळ्याच्या बीयांमध्ये झिंक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारायला मदत होते. सोबतच स्मरणशक्तीदेखील सुधारते.  


ऑलिव्ह ऑईल - 


ऑलिव्ह  ऑईलचा आहरात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. चपात्यांवर साजूक तूपाला हा एक हेल्दी पर्याय आहे. यामुळे मेंदूचं आरोग्य जपायला मदत होते.  


आहारतज्ञांच्या माहितीनुसार, आहारात अधिक प्रमाणात मीठ, साखर, तळलेले पदार्थ, फास्ट फूडचा आहारात समावेश केल्याने मेंदूच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.