मुंबई : अनेक महिलांना मासिकपाळीचा त्रास नकोसा वाटतो. या दिवसांमध्ये होणारा पोटदुखीचा त्रास, पोटात क्रॅम्स येणं याच्या सोबतीने अ‍ॅक्ने, पीएमएस आणि होणारा इतर त्रासही डोकेदुखी वाढवणारा असतो. बदलती लाईफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या विचित्र वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे आरोग्यावर आणि मासिकपाळीवरही परिणाम होतो.  
मासिकपाळीच्या दिवसात होणारा त्रास लक्षात घेता पूर्वीच्या काळी स्त्रियांना सक्तीचा आराम देणं शक्य होते. मात्र आजकाल करियर, काम आणि अभ्यास अशा अनेक गोष्टींवर कसरत करत पुढे जावं लागतं. त्यामुळे मासिकपाळीच्या दिवसातही अनेकींना काम करावच लागतं. मग अनियमित मासिकपाळी सुरळीत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी आहारात फक्त हा बदल करून पाहण्याचा सल्ला सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिल्या आहेत. 


वेदनारहित मासिकपाळीच्या दिवसांसाठी खास डाएट टीप्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1.नाचणीचा आहारात नियमित समावेश करावा. डोसा, भाकरी, खीर अशा विविध स्वरूपात नाचणी आहारात समाविष्ट करता येऊ शकते. नाचणीमुळे क्रम्प्स कमी होणं, मासिकपाळीच्या दिवसात अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी नाचणी फायदेशीर ठरते.  


2. खोबरं, तूप, गूळ, आळीब यांचा आहारात समावेश केल्यानेही मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो. चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठीदेखील मदत होते. मासिकपाळीपूर्वी चेहर्‍यावर अ‍ॅकनेचं प्रमाण वाढण्यामागे त्वचेवरील अतिप्रमाणातील तेल हे एक कारण आहे. 


3. कच्च केळं, सुरण, डाळी यांचा आहारात समावेश केल्याने पीएमएस आणि मासिकपाळीतील मायग्रेनचा त्रासही कमी होतो. पाळीनंतर स्पॉटींग होण्याचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहण्यास मदत होते. 


4. व्यायामदेखील मासिकपाळीतील त्रास कमी करण्यास, मूड हलका करण्यास मदत करतो. व्यायाम किंवा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमुळे शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. मसल्स टोन सुधारण्यासाठी, हाडांची डेन्सिटी सुधारण्यासाठी  वेट ट्रेनिंग  मदत करते.  वेळेआधीच मेनोपॉज आरोग्याला धोकादायक ! 'या' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको


5. सुप्तबद्धकोनासन या योगासनामुळे मासिकपाळीत अतिरक्तस्त्राव होणं, वेदना यांचा त्रास कमी करण्यास मदत करते. प्रसुती सुलभ होण्यासाठीदेखील या योगासनाचा फायदा होऊ शकतो. 


6. कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट यांचा आहारात समावेश करा. मासिकपाळीच्या दिवसातील क्रॅम्प्स, डॉकेदुखी, पाठीचं, कंबरेचं दुखणं कमी करण्यासाठी मदत होते. मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय