Cornstarch Vs Corn-flour : आजकाल महिला असो वा पुरुष आपल्या किचनमध्ये (Kitchen) वेगवेगळे व्यंजन (Consonance) बनवतात. इंडियन फूड (Indian food), चायनीज फूड (Chinese food) इत्यादी व्हेज-नॉनव्हेज व्यंजन (Veg-non-veg dishes) तयार करतात. यासाठी तुमच्या किचनमध्ये वेगवेगळे इंग्रीडिएंट्स (Ingredients) असतात. त्यातील कॉर्न फ्लोअर (Corn-flour) आणि कॉर्नस्टार्च (Cornstarch) हे असं इंग्रीडिएंट्स आहे, जे अनेक व्यंजन तयार करण्यासाठी वापरलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अनेकांना कॉर्न फ्लोअर आणि कॉर्नस्टार्च एकच आहे असं वाटतं. अनेक जण मक्याचे पीठ वापरतात, पण मक्याचे पीठ, मक्याचे स्टार्च, कॉर्न मील पीठ यात काय फरक आहे आणि ते कसे वापरले जाते हे त्यांना माहिती नसते. कॉर्नफ्लोअर, कॉर्न मील फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च एकच आहे असे बर्‍याच जणांना वाटत असले तरी, खरंच असे आहे का? जर होय, तर कॉर्न फ्लोअर, कॉर्न मील फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च बद्दल जाणून घेऊया. (Difference between Corn Flour and Cornstarch video nmp)


काय आहे कॉर्न फ्लोअर? (What is corn flour?)


बऱ्याच लोकांना कॉर्न फ्लोअर म्हणजे कॉर्न स्टार्च वाटतं. इंग्रजीत मक्याचे पीठ म्हणजे कॉर्न फ्लोअर. जे संपूर्ण कॉर्नपासून पावडर तयार केली जाते. याचा रंग किंचित पिवळा असतो. 


कॉर्न स्टार्च म्हणजे काय? (What is Corn Starch?)


कॉर्नस्टार्च हे कॉर्न कर्नलच्या पांढऱ्या स्टार्च एंडोस्पर्मपासून बनवलं जातं. त्यात कॉर्न स्टार्चचं प्रमाण जास्त असतं आणि हे कॉर्न कर्लमधील प्रथिने, फायबर काढून बनवलं जातं. त्यात शेवटी एंडोस्पर्म नावाचा स्टार्च शिल्लक राहतो. त्यामुळे याचा रंग पांढरा आणि हे बारीक पावडर असतं.


दोघांमध्ये काय फरक आहे? (Difference between Corn Flour and Corn starch)


तर होय, या दोघांमध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही बनवण्याच्या प्रक्रियेतच नाही तर त्यांच्या रंगातही खूप फरक आहे.  कॉर्न फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च दोन्ही कॉर्नपासून बनवले जातात. परंतु ते त्यांच्या पोषक प्रोफाइल, चव आणि वापरांमध्ये भिन्न आहेत. 


प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Famous Chef Vishnu Manohar) यांनीही खूप सोप्या पद्धतीने कॉर्न स्टार्च आणि कॉर्न फ्लोअरमधील फरक समजून सांगितला आहे. 


पाहा त्यांचा हा व्हिडीओ (video)