Difference Between Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे. चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या नवा व्हेरियंट BF.7 ची दहशत पसरली आहे. या व्हेरियंटचे रुग्ण आता भारतातही आढळून आले आहेत. अश्यात हिवाळ्यात झालेली सर्दी अनेकांना कोरोना झाल्यासारखी वाटते. त्यामुळे सर्दी की कोरोना असा संभ्रम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BF.7 हा व्हेरियंट ओमायक्रॉन टाईपमधला एक उपप्रकार आहे. याची लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. यात सर्दी, खोकला, नाक वाहणे, ताप आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. दुसरीकडे, हिवाळ्यात अनेकांना  सर्दी आणि खोकला होतो. अशा परिस्थितीत सर्दी किंवा वेदना ही लक्षणे वाढत्या थंडीमुळे जाणवत आहेत की ओमिक्रॉनमुळे हे कळणे कठीण होतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर दोन मिनिटात जाणून घ्या कोरोना झालाय की सर्दी...


बातमी वाचा- Throat Infection: घसा खवखवतोय का! मग हे घरगुती उपचार करून खोकला पळवा


'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मेदांता हॉस्पिटलच्या वरिष्ठ डायरेक्टर इंटरनल मेडिसिन डॉ. सुशीला कटारिया यांनी सर्दी किंवा कोविड यातला फरक सांगितला आहे. त्यांच्या मते, भारतात हा प्रकार ऑगस्ट 2022 पासून उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. वेगाने पसरलातरीही भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. कारण संसर्ग गंभीर टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही.


Omicron BF.7 लक्षणं


ओमायक्रॉन BF.7 झाल्यास घसा खवखवणे, ताप, नाक वाहणे, खोकला, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, धाप लागते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ताप आणि खोकल्यासारखी लक्षणे 5 दिवसांनंतरही कायम राहिल्यास, अशा परिस्थितीत कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. कारण काही सामान्य लक्षणांमुळे लोक गोंधळून जाऊ शकतात.


(Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. जर तुम्ही आजारी असाल किंवा तत्सम लक्षणे असतील तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)