Disadvantages of lack sleep: कमी झोप घेत असाल तर सावधान, यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते
झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाला किमान 8 तास झोप असणे महत्वाचे आहे.
मुंबई : झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाला किमान 8 तास झोप असणे महत्वाचे आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला 8 तास झोप मिळत नसेल, तर समजा तो त्याच्या आरोग्याशी खेळत आहे. कारण निरोगी जीवनशैलीसाठी आहार आणि व्यायाम जितका महत्त्वाचा आहे, तितकीच झोपही महत्त्वाची आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे निरोगी शरीरासाठी, प्रत्येक व्यक्तीने किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, परंतु या तंत्रज्ञानाच्या जगाने माणसाची संपूर्ण दिनचर्याच बिघडवली आहे.
कामाचा ताण इतका असतो की, शांत झोपेसाठीही बरेच प्रयत्न करावे लागतात. अंथरुणावर पडूनही मन थकलेल्या शरीराला नीट झोपू देत नाही आणि तासनतास आपण बाजू बदलत राहतो. तुम्हालाही ही अशी समस्या असेल, तर काळजी घ्या आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
पुरेशी झोप न मिळण्याचे तोटे
1. तणाव, राग आणि नैराश्याच्या समस्या
जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुमच्या मनाला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे तणाव वाढतो आणि तणावाच्या परिस्थितीत कोणतेही काम नीट करता येत नाही. अशा स्थितीत राग, चिडचिड, नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू लागतात.
2. मनावर नकारात्मक परिणाम होतो
देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या मते, झोपेच्या कमतरतेचा शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
3. हृदयाच्या आरोग्याला धोका
पुरेशी झोप न मिळाल्याचा थेट परिणाम शरीराच्या चयापचय दरावर होतो. त्यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. अशा परिस्थितीत हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि हाय बीपी, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
4. सर्दीचा धोका वाढतो
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक रात्री सहा तास किंवा त्याहून कमी झोपतात त्यांना सर्दी होण्याची अधिक शक्यता असते.
5. प्रतिकारशक्ती कमकुवत
जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नसेल, तर त्याचा परिणाम त्याच्या प्रतिकारशक्तीवरही होतो. यासंबंधित एक संशोधनही समोर आले आहे, ज्यातून हे सिद्ध होते की इम्युनोलॉजिकलचा झोपेशी जवळचा संबंध आहे. अशा परिस्थितीत जेव्हा झोपेवर परिणाम होतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो.