मुंबई : असे म्हणतात की, काळासोबत प्रत्येकाने बदलण्याची गरज आहे आणि ते बरोबर देखील आहे. तसेच हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे जिथे चांगलं असतं, तेथे वाईट देखील असतं. जर आपण भारतातील मुलींच्या लग्नाबद्दल बोललो, तर पूर्वीच्या काळी मुलींची लग्नं अगदी लहान वयात होत असत, पण आता तसे नाही. आजच्या काळात मुलींनाही शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे उशिरा लग्न करायला आवडते. अनेक वेळा वाढत्या वयात लग्न झाल्यामुळे महिलांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच समस्यांबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांनी उशीरा लग्न केल्यामुळे होणारे नुकसान कोणते हे जाणून घेऊ.


1. जोडीदाराशी जुळवून घेणे कठीण


तरुण वयात महिलांचे लग्न झाल्याचा एक फायदा म्हणजे त्या लहान असताना जोडीदाराशी जुळवून घेणे सोपे जाते. पण जेव्हा तुम्ही दीर्घकाळ अविवाहित आणि स्वतंत्र राहता. मग मोठ्या वयात लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आवडी-निवडी आणि गरजांशी ताळमेळ राखणे काहीसे अवघड होऊन बसते. तसे करण्यात अयशस्वी झाल्यामुळे नातेसंबंधात दुरावा येतो.


2. गोष्टी एक्सप्लोर केल्यासारखे वाटत नाही


मुलींना लहान वयातच अनेक छंद असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसा उत्साह कमी होत जातो, त्यामुळे एका वयात महिलांचे लक्ष प्रवासावर किंवा गोष्टी शोधण्यावर नसून जबाबदाऱ्यांवर जास्त असते. तर गोष्टींचा शोध घेऊन आणि फिरून मन बरोबर राहते.


3. गरोदर राहण्यात अडचण


वयानुसार महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. एका संशोधनात असे म्हटले आहे की, वाढत्या वयामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही निरोगी मूल होण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.


याशिवाय वाढत्या वयानुसार महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो आणि गर्भपात आणि प्रसूतीमध्ये अडचणी येतात. वृद्ध पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना डाउन सिंड्रोम (मानसिक आणि शारीरिक विकार) आणि इतर शारीरिक समस्यांचा धोका जास्त असतो.


त्यामुळे तुम्ही देखील उशीरा लग्न करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)