Diwali 2022: फटाके ठरु शकतात Heart attack चं कारण, अशी घ्या काळजी
दिवाळी दरम्यान हृदयरोगाच्या रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स.
Health news for Diwali: भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. जो देशभरात साजरा केला जातो. या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे अर्थातच प्रदुषण वाढतं. फटाके फोडल्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. परंतु आपल्या आरोग्यास यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता खालावली आहे, पहिले फटाक्यांमुळे आणि दुसरे म्हणजे थंडीच्या हंगामामुळे. असे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयरोग्यांना धोका असतो. त्यामुळे काय काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊया.
सकाळी योगा करा
प्रदूषित हवा फुफ्फुसांना कमकुवत करते. त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या, अन्यथा रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. फुफ्फुस आणि हृदय मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी योगा करू शकता. सकाळची हवा शुद्ध मानली जाते, अशा स्वच्छ हवेत योगासने केल्यास आरोग्याला फायदा होईल.
औषधे वेळेवर घ्या
खराब हवेमुळे हृदयरोगाच्या रुग्णांची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे औषधे वेळेवर घ्या. औषधे चुकवू नका. वेळोवेळी रक्तदाब तपासत राहा. भीती वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घराबाहेर जाणं टाळा
प्रदूषित हवेत घराबाहेर पडणे योग्य नाही, त्यामुळे बाहेर जाणे टाळा. अगदी आवश्यक असेल तेव्हाच बाहेर जा आणि कुठेही जाताना मास्क घालायला विसरू नका. मास्क प्रदूषित हवेपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करतो, ज्यामुळे बॅक्टेरिया देखील आत प्रवेश करत नाहीत. पण लक्षात ठेवा की मास्क चांगल्या दर्जाचा असावा. साध्या कापडाचे मास्क घालणे योग्य नाही.
योग्य आहार
प्रदूषणाची समस्या टाळण्यासाठी काही आरोग्यदायी गोष्टींचे सेवन केले जाऊ शकते. जास्त पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. अधिक हिरव्या भाज्या खा, फळे खा. गुसबेरी इत्यादी अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या गोष्टी खा.