Weight Loss Diwali: सध्या सर्वांच्या आवडता सण म्हणजेच दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीनिमित्त (Diwali 2022) घरोघरी चमचमीत फराळाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. लाडू, चकली, करंजा, शंकरपाळी, चिवडा, शेव, अनारसं असे बरेच पदार्थ करण्यात अनेकजण गुंतले आहेत. दिवाळी खालल्याने अनेकांना वजन वाढण्याची भीती असते. त्यामुळे अनेकजण (Weight Loss Diwali) मन मारून दिवाळी पदार्थ खाण्याचं टाळतात. मात्र, आता तुम्ही बिनधास्त गोडधोड खाऊ शकता.


कोमट पाणी प्या (Drink warm water)-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीत तुम्ही तेलकट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास 15 मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे अन्न पचायला सोपं जातं आणि वजनही वाढत नाही. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतरही गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होतं. त्यामुळे तुम्ही दिवाळी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.


वेळेवर झोपा (Sleep on time) -


अनेकदा सणासुदीच्या काळात वेळेवर झोप होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सण आणि त्यासोबत येणार्‍या कामाचा विचार करत असाल, तर तुम्हाला योग्य झोपेसाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती कामं करा आणि पुरेशी झोप घ्या.


फायबरयुक्त पदार्थ खा (Eat fiber rich foods)  -


फायबरयुक्त आहार आणि अन्नपदार्थ तुम्हाला तुमचे आतडे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात आणि इतकंच नाही तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करतात जे या आणि प्रत्येक सणाच्या हंगामात अत्यंत आवश्यक आहे.


गुळाचा वापर करा (Use jaggery) -


दिवाळीत तुम्ही घरी गोड पदार्थ बनवत असाल तर साखर वापरली जाते. त्याऐवजी गुळाचा वापर करू शकता. साखरेऐवजी गुळाचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे. त्यामुळे वजन वाढत नाही.


काळं मीठ वापरा (Use black salt)- 


गोड पदार्थांसह मीठ तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, म्हणून तुम्ही खारट पदार्थांमध्ये काळ्या मीठाचा वापर करू शकता. त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. बीपीच्या रुग्णांनी दररोजच्या जीवनात याचा वापर करावा.