Weight Loss: दिवाळीत टिचभर पण वजन वाढवायचं नाही, मग `या` टिप्स कटाक्षाने पाळा
Weight Loss Tips During Diwali : दिवाळीचा सण अगदी काही दिवसावर आला आहे. साफसफाईसोबतच फराळाची देखील जोरदार तयरी सुरु झाली असेल. अशावेळी डाएट फॉलो करत असाल तर आता वजन वाढणारच असा प्रश्न मनात येत असेल. पण घाबरु नका... खालील टिप्स अगदी काटेकोरपणे टाळा इंचभरही वजन वाढणार नाही.
Weight Loss: दिवाळीचा उत्सव लवकरच सुरु होणार आहे. हा असा सण आहे जेव्हा आपण कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो. या दिवसांमध्ये गप्पा आणि खाण्यावर अतिशय ताव मारला जातो. घरात वेगवेगळे पदार्थ तयार होतात अगदी फराळापासून ते मिठाईपर्यंत सगळंच चाखलं जातं. पण तुम्हाला दिवाळी जवळ येतेय तशी वेट लॉसची चिंता वाटतेय. कारण अशा दिवसांमध्ये वजन कंट्रोल करणे अतिशय महत्त्वाचे असते. अशावेळी तुम्हाला खाली दिलेल्या टिप्सनुसार वजन कंट्रोल करायचा आहे. या टिप्समुळे तुमचं वजन टिचभरही वाढणार नाही.
दिवसाची सुरुवात याने करा
तुमचा चयापचय सुरू होण्यासाठी तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी आणि लिंबाच्या रसाने करा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला हायड्रेट ठेवता येते. लिंबू पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पेक्टिक फायबर, पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. जे क्रेविंगशी लढण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
व्यायाम न चुकता करा
सुट्ट्या किंवा सणाच्या दिवसांमध्ये आपण थोडे रिलॅक्स असतो. पण अगदी रिलॅक्स न होता दररोज व्यायाम किंवा वर्कआऊट करणे अत्यंत गरजेचे असते. या दिवसांत थोडा कंटाळा केला जातो पण तसं न करता वर्कआऊट करावे. तसेच कुटुंबासोबत आऊटडोर गेम्स खेळणे गरजेचे आहे. घरातील काम या सगळ्यामुळे फिजिकल ऍक्टिविटी होणे गरजेचे आहे.
पोर्शन कंट्रोल
सणांमध्ये वेगवेगळा आहार खाल्ला जातो. अगदी मिठाई किंवा पक्वान यावर ताव मारला जातो. पण अगदी या दिवसांत आपलं डाएट न विसरता स्वतःच्या खाण्यावर कंट्रोल करा. विचार करून खाणे गरजेचे आहे. ओवरईटिंग करु नका. तेकलट आणि गोड पदार्थांसोबतच प्रोटीनयुक्त आहार देखील डाएटमध्ये घ्या. तसेच जे काही खाल त्याचे पोर्शन कंट्रोलमध्ये ठेवा.
हायड्रेट राहा
दिवाळीत थंडीचे आगमन होते त्यामुळे वातावरण गार असतं. थंडीत आपण कमी पाणी पितो त्यामुळे हायड्रेट राहणे गरजेचे असते. अधिक प्रमाणात पाणी प्यावे आणि हायड्रेट राहा. जरी गोड खाण्याच क्रेविंग होत असेल तर वजन वाढणार नाही ना याची काळजी घ्या.
भरपूर चाला
सणाच्या दिवसांमध्ये नातेवाईकांकडे जाणं जास्त होतं. अशावेळी चालत जा ज्यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील. प्रत्येक 2 तासांत 15 मिनिटे जरुर चाला. लिफ्टचा वापर न करता चालत जिने चढा आणि उतरा. सामान खरेदी करण्यासाठी गाडीचा वापर न करता चालत जा. या दिवसांतही चालणे महत्त्वाचे असल्याच सांगा.