Diwali 2023 : दिवाळीमध्ये सगळीकडे कंदील आणि पणती का लावतात? यामागचं कारण फारच इंटरेस्टिंग

Diwali Importance : दिवाळी अवघी तोंडावर आली आहे सगळीकडे लगबग सुरु आहे. पण दिवाळीत कंदील आणि दिवे का लावतात? तुम्हाला माहित आहे का? 

| Nov 02, 2023, 18:45 PM IST

Diwali : दिवाळीची लगबग सगळीकडे सुरु झालीय. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी असून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळी म्हटलं की, पहिलं आठवतं ते रोशनाई करणारे दिवे आणि कंदील. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की दिवाळीत कंदील आणि दिवे का लावतात? त्यामागचं कारण काय आहे. 

1/7

उत्साहाचा सण

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

दिवाळी हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. हिंदू धर्मातील हा अतिशय महत्त्वाचा सण. देशभरातील कुठेही हिंदू धर्मीय असला तरीही तो हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. दिवळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट आणि पारंपरिक, युनिक अशा कंदिलांची रोशनाई.   

2/7

प्रकाशमय सण

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून ओळखला जातो. या सणाला प्रकाशाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी असते जेव्हा सर्वत्र काळोख पसरलेला असतो. या काळोखात दिवाळी हा सण प्रकाशमय म्हणून महत्त्वाचा असतो. 

3/7

अंधारावर प्रकाशाचा विजय

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

अंधारावर प्रकाशाचा विजय याचे प्रतिक म्हणून दिवाळीत सगळीकडे प्रकाशमय वातावरण असते. अंधार हा कितीही गडद असला तरीही प्रकाशाचे एक किरण अंधार भेदून टाकते. अंधाराचा, नकारात्मक विचारांचा नाश करायचा असेल तर सकारात्मक प्रकाशाची ज्योत लावणे अत्यंत गरजेचे असते.   

4/7

दिव्यांनाही महत्त्व

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

दिवाळी जसे कंदिलाच्या प्रकाशाला महत्त्व आहे. अगदी तसेच प्रकाश देणाऱ्या दिव्यांना देखील महत्तव आहे. दिवाळी या शब्दातच दिवा आहे. त्यामुळे दिवाळीला दिव्यांचे महत्त्व अधिक आहे. 

5/7

पणतीचे महत्त्व

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

दिव्याची ज्योत जशी स्वतःहून जळून इतरांना प्रकाश देते अगदी तसेच आपणही आपल्या जीवनात कष्ट करुन इतरांना मदत करायला हवी हे यामधून सांगितलं जातं. तसेच दिव्याची ज्योत ही ताठ असते ती कायम जीवन जगण्याची प्रेरणा देते. कितीही कष्ट आले तरी न डगमगता कार्यशील असणे अत्यंत गरजेचे आहे. 

6/7

गायीच्या तुपाचा दिवा

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

दिवाळीत दिवा लावत असताना गायीच्या शुध्ध तुपाचा दिवा लावणे आवश्यत असते. शास्त्रात याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. 

7/7

तुळशीसमोर लावावा दिवा

Why Lantern and Diya Important in Diwali Know Special Significance on Kandil and Panti

दिवाळीत आणि इतर दिवसांमध्येही तुळशीसमोर रोज दिवा लावावा. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवा हा कायमच सकारात्मकेच प्रतिक आहे.