मुंबई : काही लोकं फार नशीबवान आहात ज्यांचे व्यायाम न करता आणि डाएटिंग न करता वजन कमी होते. मात्र प्रत्येकासाठी हे शक्य नाहीये. अनेकजण वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. तसेच खाणेही कंट्रोल करतात. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही वजन काही कमी होत नाही. पोटावरची चरबीही कमी होत नाही. वजन कमी कऱण्यासाठी नैसर्गिक पद्धत अवलंबली पाहिजे. यामुळे शरीरात जमा असलेले टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होईल आणि तुम्ही लवकर बारीक व्हाल. जुन्या काळापासून लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी, मध आणि लसूण या मिश्रणाचे सेवन करत आलेत. यामुळे चांगला रिझल्ट मिळाला आहे.


कच्चा लसूण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या लसूणमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. लसणाचे मधासोबत सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. या दोनही पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरातील वाईट पदार्थ बाहेर फेकले जातात. 


तुम्ही लसणाचे सेवन कोणत्याही पद्धतीने करु शकता. गरम पाण्यात मध, कोरफड, लिंबाचा रस, अॅपल सिडार व्हिनेगार वा हर्बल चहामध्ये मिसळून कच्चा लसूण खा. हे मिश्रण रिकाम्या पोटी घेतल्यास याचा अधिक फायदा होईल.