मुंबई : डाळिंब केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर सौंदर्य खुलवण्यासाठीही त्याचा हमखास फायदा होतो. आयुर्वेदामध्येही डाळिंबाचा उल्लेख रोगनाशक आणी सौंदर्यवर्धक असा करण्यात आला आहे. डाळिंबाम्ध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉलिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकही मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी त्याचा फायदा होतो. साखर आणि डाळिंबाचा स्क्रब त्वचेला खुलवण्यास मदत करतो. 


डाळिंबाचा स्क्रब - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चमचाभर खोबरेल तेल 
अर्धा चमचा साखर 
अर्धा कप डाळिंबाचे दाणे 
दोन चमचे मलाई / साय  


कसा बनवाल स्क्रब 


साखरेची जाडसर भरड करा. सोबतच डाळिंबाचे दाणेही क्रश करा. या मिश्रणामध्ये उर्वरित सारे घटक मिसळा. तुमचा स्क्रब झटपट तयार होईल. 


कसा वापराल हा स्क्रब ? 


स्क्रब वापरण्यापूर्वी चेहरा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ धुवावा. 
तयार स्क्रब हातावर घेऊन चेहर्‍यावर आणि मानेवर गोलाकार दिशेने हळूवार फिरवा. 10 मिनिटं मसाज करा.
स्क्रब चेहर्‍यावर लावल्यानंतर मृत त्वचेचा थर निघून जाण्यास मदत होईल. यामुळे त्वचेवर तजेला येण्यास मदत होते. आठवड्यातून 3 वेळेस हा स्क्रब वापरल्याने चेहर्‍यावरील डाग कमी होण्यास मदत होते. 


कसं करणार काम ? 


डाळिंब्यातील अ‍ॅन्टी मायक्रोबियल आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचेतील इंफेक्शन कमी करण्यास मदत करतात. त्वचेवरील ओपन पोअर्स कमी करण्यास मदत होते. डाळिंबामुळे त्वचेतील कोलेजन घटकाचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणंही कमी होते. 


डाळिंब्याच्या दाण्यांप्रमाणेच या स्क्रबमध्ये डाळिंब्याच्या सालीचा समावेश करता येऊ शकतो. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन ई घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवरील नाजूक टिश्यूंचं नुकसान होण्यापासून बचाव होतो.