`या` गोष्टीसोबत चुकूनही खाऊ नका दही, नाहीतर शरीराचं होईल मोठं नुकसान
उन्हाळ्यात दही खाल्ल्यानेही खूप फायदा होतो, त्यामुळे ते खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. परंतु...
मुंबई : उन्हाळा सुरू आहे, ज्यामुळे बरेच लोक हे उष्णतेने हैराण झाले आहे. या काळात आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सगळेच लोक जास्त पाणी पिण्याकडे लक्ष देतात. तसेच या काळात अनेक लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी देखील वेगवेगळे पदार्थ खातात. या ऋतूत दह्याचा वापर खूप वाढतो. दह्यापासून बनवलेली लस्सी असो की रायता किंवा मग ताक, लोकांना सगळंच खूप आवडतं.
उन्हाळ्यात दही खाल्ल्यानेही खूप फायदा होतो, त्यामुळे ते खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. परंतु सगळ्याच वस्तुसोबत दही खाणे चांगले नाही, हे देखील डॉक्टरांकडून सांगितले जाते.
त्यामुळे कोणत्याही पदार्थांसोबत दही खाल्ले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा नाही.
अनेकांना दही आणि कांदा मिसळून खायला आवडते. जर तुम्हाला देखील असंच खाण्याची सवय असेल तर, आताच सावध व्हा. कारण हे तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्याचे काम करते.
याशिवाय जर तुम्ही इतर काही गोष्टींसोबत दही खात असाल, तर ते तुमचे नुकसान करू शकते. चला तर जाणून घेऊ या की, आणखी कोणत्या गोष्टींसोबत दही न खाण्याचा सल्ला आपल्याला तज्ज्ञ देतात.
आंब्यासोबत दही खाऊ नये
आंबा आणि दूध घालून बनवलेला मँगो शेक उन्हाळ्यात बरेच लोक आवडीने पितात. पण जर तुम्ही दही मिसळून आंबा खाण्याचा विचार करत असाल, तर ही चूक अजिबात करू नका. दही आणि आंबा खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.
गरम पदार्थांसोबत दही खाऊ नये
दही शरीरात शीतलक म्हणून काम करते. त्यात काही गरमागरम पदार्थ घालून खाण्याचा प्रयत्न केला तर ते शरीराला नुकसान पोहोचवते. थंड आणि गरम एकत्र खाल्ल्याने दातांचे नुकसान देखील होऊ शकते.
या डाळींसोबत दही खाऊ नका
दही आणि उडीद डाळ एकत्र खाणे हानिकारक आहे. त्यामुळे शरीरात अॅसिडिटी, फुगणे, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला खायचे असेल, तर थोडा वेळ अंतर ठेवा आणि मग खा.
मासे आणि दही एकत्र खाऊ नका
दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, असे तज्ज्ञ सांगतात. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. हे पदार्थ तुम्ही एकत्र खाण्याचा प्रयत्न केल्यास अपचन, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
दही शरीराला अनेक फायदे देते
काही गोष्टी मिसळून दही खाल्ल्याने होणाऱ्या हानीकडे जर तुम्ही दूर्लक्ष केलात, तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय दात आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय तुमचे हृदयही निरोगी राहते.