मुंबई : गर्भावस्थेत संतुलीत आहार घेणे फार गरजेचे असते. तुमची एक चूक तुमच्या आणि बाळाच्या आयुष्यावर बेतण्याची शक्यता असते. नकळत काही चुकीच्या पदार्थांमुळे गर्भपात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा अवस्थेत प्रत्येक पदार्थांची माहिती असणे फार गरजेचे. गर्भधारणेदरम्यान खालील पदार्थांचा आहारात समावेश करणे फार धोकादायक ठरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कच्ची पपई :
पपई आरोग्यासाठी फार आरोग्यदायी असते, पण गर्भवती महिलांसाठी पपई फार धोकादायक ठरू शकते. पपईच्या सेवनामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते. परिणामी गर्भपात होण्याची शक्यता वाढते. 


धुम्रपान : 
गर्भवती जितके जास्त धुम्रपान करेल तितक्या प्रमाणात बाळाचे वजन कमी होत जाते. त्यामुळे नवजात बालकाचे वजन कमी राहाते. गर्भावस्थेत धूम्रपान करणाऱ्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळाचे वजन, धूम्रपान न करणाऱ्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांच्या वजनापेक्षा सुमारे १७० ग्रॅमने कमी असते. दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या नवजातांचे वजन अधिकच कमी भरते. 


चायनीज पदार्थ : 
चायनीज फूड बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी अधिक घातक असतात. आईने गर्भधारणेच्या काळात चायनीज पदार्थांचे सेवन केल्यास जन्मानंतर बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. चायनीजमध्ये जास्त प्रमाणात सोया सॉसचा वापर केला जातो, ज्यामुळे उच्च रक्त दाबाच्या समस्या उदभवण्याची शक्यता असते. 


कच्चे अंडे : 
रोज दोन कच्चे अंडे खाल्ल्याने तुम्हाला एक सफरंचंदा येवढे अँटीऑक्सीडेंट मिळू शकते. कच्चे अंडे वाढत्या वयात मासपेश्यांना मजबूत बनवतात. पण गर्भवती महिलांसाठी कच्चे अंडे घातक ठरू शकते.