मुंबई : तुम्ही जर नियमित व्यायाम करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असलेली वेगवेगळी साधनं तुम्हाला तुमचा वर्कआऊट अधिक फायदेशीर ठरण्यासाठी मदत करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमच्या व्यायामाला कुठल्याही समस्येविना पूर्ण करू इच्छित असाल तर, तुमच्या बॅगेत काही अॅक्सेसरीज असणं गरजेचं आहे. त्यामुळे फिटनेसकडे तुमचे लक्ष राहील. फिटनेसचे सह-संस्थापक आणि फॅशन क्युरेटर आरूषि वर्मा यांच्या मते, जिम जाताना आपण खालील अॅक्सेसरीज बॅगेत ठेवणं गरजेचं आहे.


तुमच्या बॅगेत या वस्तू आहेत का?


- फोम रोलर्स हे एक स्वस्त साधन आहे. हे वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्रीड, ब्लॅक फोम रोलर आणि फम रंबल रोलरचा समावेश आहे. या फम रोलरचा वापर तुम्ही तुमच्या दररोजच्या व्यायामात करू शकता


- आजकाल बाजारात आर्मबॅन्डची उत्तम मागणी आहे. हे बॅंड विविध रंग, वजन आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत. ते तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. आपण आर्मबॅन्ड खरेदी करता तेव्हा तो आपल्या स्मार्टफोनच्या बरोबरीचा आहे की नाही याची खात्री करा. यात जल प्रतिरोधक आणि चांगल्या स्ट्रेचची क्षमता असणारा बॅन्ड निवडा.


- नियमितपणे जर तुम्ही वजन उचलत असाल तर तुम्हाला माहित असेल की, आपल्या सुरक्षेसाठी ग्रीप किती महत्त्वाची असते. त्यासाठी तुम्ही चांगला ग्लोव्ह्जचा वापर केला पाहिजे. जो घामेजल्या हातांचा ओलसरपणा शोषण्यात मदत करतो आणि वजन उचलताना आपल्या बोटांना चांगली पकड राखण्यात मदत करतो.  


- हलके आणि चांगली फिटिंग असणाऱ्या ब्रीथेबल कपडयांचा वापर करा


- तुमच्या डायरीत सेट, रॅप, वजन आणि आराम या वेळेची नोंद ठेवा


- नियमितपणे तुम्ही किती वेळेत व्यायाम करता या गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला एक चांगला हार्ट रेट मॉनिटर तुमच्याजवळ ठेवा. जेणेकरून तुम्हाला तुमचं दररोजचं वर्कआउट समजेल.