COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे जो तो मल्टिटास्किंग बनलाय. घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना आपल्या फिटनेसकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे असते. यामुळे अनेकदा वेळ कमी असल्याने आपण जेवण अधिक बनवतो आणि ते फ्रिजमध्ये ठेवून खातो. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा गरम करुन खाल्ले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का अन्न पुन्हा गरम करणाय्चाय सवयीमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येतेय. जाणून घ्या असे काही खाद्यपदार्थ जे पुन्हा गरम करुन कधीही खाऊ नयेत.



अनेकदा घरामध्ये चिकन मोठ्या प्रमाणात बनवले जाते आणि ते फ्रीजमध्ये ठेवले जाते. मात्र चिकन पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीनचे कॉम्पोझिशन बदलते तसेच यातील तत्व कॅन्सरला कारणीभूत ठरतात. यासाठी चिकन पुन्हा गरम करु नये. 



बटाटा न आवडणारी व्यक्ती विरळच म्हणावी लागेल. बटाट्याची सुकी भाजी असो वा ग्रेव्ही साऱ्यांनाच ती आवडते. मात्र बटाटाही पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषकतत्वे निघून जातात. तसेच पचनक्रियेवरही परिणाम होतो.



पालकाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात. मात्र पालक पुन्हा गरम करुन खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरते. पालकात नायट्रेटच असते जे गरम केल्यानंतर विषारी तत्वात बदलते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. 



बीट शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी बीटाचे सेवन केले जाते. मात्र बीट पुन्हा गरम केल्याने त्यातील नायट्रेट नष्ट होते. बीट कच्चे खाल्ल्याने शरीरातील रक्त लवकर वाढते.



मशरुम आरोग्यासाठी चांगले असते. ताजे मजरुम खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. मात्र मशरुम कधीही शिळे वा गरम करुन खाऊ नये. हे शरीरासाठी हानिकारक असते.



भातही पुन्हा गरम करुन खाऊ नये. कच्च्या भातात कीटाणू असतात जे भात शिजल्यानंतर मरतात. भात पुन्हा गरम केल्याने विषबाधा होण्याची शय्कता असते.



ओव्हनमध्ये अंडे कधीही गरम करु नये. कारण ओव्हनमध्ये दबाव वाढल्याने अंडे बॉम्बप्रमाणे फुटूही शकते. त्यामुळे ते कधीही ओव्हनमध्ये शिजवू नये.