Stomach Pain : पोट दुखणं (Stomach Pain) ही सर्वसामान्य गोष्ट आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle )अनेकदा पोटदुखीची त्रास जाणवतो. बऱ्याच वेळा ही पोटदुखी खूप काळ टिकून राहते अश्यावेळी आपण Painkiller गोळ्याचा वापर करुन इलाज करण्याचा प्रयत्न करतो पण तसे अजिबात करु नका. तुम्हाला साधी वाटणारी पोटदुखी गंभीर आजाराचे लक्षण सुद्धा असू शकते. 


कशी ओळखाल पोटदुखीची गंभीर लक्षणे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटदुखी किती गंभीर आहे हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ठरवले जावू शकते. कारण बहुतेकदा अन्नातून झालेली विशबाधा, एखाद्या खाद्यपदार्थची एलर्जी किंवा बद्धकोष्ठतामुळे यामुळे सुद्धा पोटदुखी जाणवते. 


पण जर 24 तासापेक्षा उल्टी, अतिसार किंवा तापचा त्रास जाणवत असेल, तसेच भूख न लागणे, पोटात सूज आल्यासारखे वाटणे, वजन कमी होणे ही काही लक्षणे आढळत असतील तर पोटदुखीची गंभीर लक्षण असू शकतात तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या 


पोटासंदर्भातील आजार आणि त्यांची लक्षणे  


Appendicitis (अपेंडिसाइटिस)


अपेंडिसाइटिस हा अपेंडिक्समध्ये जळजळ झाल्यामुळे होणारा आजार आहे, जो उपचार न केल्यास प्राणघातक ठरतो. अपेंडिसायटिसमध्ये, ओटीपोटात एक तीक्ष्ण वेदना असते जी सहसा नाभीभोवती सुरू होते आणि पोटाच्या उजव्या खालच्या भागापर्यंत जाणवते. याशिवाय या अवस्थेत सतत वेदना होत असतात ज्या कालांतराने अधिकच वाढतात. अपेंडिक्स शस्त्रक्रियेने काढून टाकले जाते. जर ते उपचाराशिवाय सोडले तर 48 ते 72 तासांच्या आत अपेंडिक्स फुटण्याची शक्यता असते. 


कोलेसिस्टिटिस (Cholecystitis)


पित्ताशयाचा दाह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पित्ताशयाला सूज येते आणि पोटाच्या वरच्या उजव्या भागात अचानक वेदनादायक वेदना होतात. कधीकधी ते उजव्या खांद्यावर किंवा पाठीमागेही पोहोचते. याशिवाय, पित्ताशयाचा दाहच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, उलट्या होणे, जलद श्वास घेणे किंवा खाल्ल्यानंतर दुखणे यांचा समावेश होतो.


पैंक्रियाटाइटिस (Pancreatitis)


स्वादुपिंडाचा दाह या आजारात स्वादुपिंडात जळजळ होते. यामध्ये वेदना ओटीपोटाच्या वरच्या मध्यभागी सुरू होतात आणि तुमच्या पाठीत किंवा छातीपर्यंत पसरू शकतात. त्यात उलट्या, ताप, ओटीपोटात सूज, वेदना आणि बीपी वाढणे यांसारख्या लक्षणांचाही समावेश होतो.


पेप्टिक अल्सर  (Peptic Ulcer Disease)


पोटाच्या आत आणि लहान आतड्याच्या पहिल्या भागात अल्सर किंवा जखमा तयार झाल्यामुळे या आजाराची लागण होते. यामध्ये मळमळ-उलटी, पोट फुगणे, गॅस, पोटात जळजळ होणे आणि वजन कमी होणे ही लक्षणे आहेत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)