Mobile side effects :  मोबाईल फोन आजकाल आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. एकवेळ जेवायला विसरतील पण हातातला मोबाईल लोक विसरणार नाहीत  अशीच स्वास्थ आता लोकांची झाली आहे. आपण सगळेच सध्या मोबाईलच्या खूप आहारी गेलो आहे. अशीच काहीशी परिस्थिती सध्या जगात सगळीकडे झालीये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाइलवेडे झालेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. (mobile blue light can make you blind)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहित आहे का मोबाईचा अतिवापर आणि मुख्यतः रात्री मोबाईचा वापर केल्यामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकतं. 
स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांना आणि त्वचेलाही हानी पोहोचते.  एका संशोधनानुसार, फोन, लॅपटॉप आणि टीव्हीच्या ब्राईट स्क्रीनमुळे युझरच्या डोळ्यांशिवाय त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.  तसेच, मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा ब्लु लाईट तुम्हाला अकाली वृद्ध बनवु  शकतो.(disadvantages of mobile using)


माशांवर ब्लु लाईटचा प्रभाव जाणून घेण्यासाठी, त्यांना 2 दिवस, 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस डार्क निळ्या प्रकाशाखाली ठेवण्यात आलं.  यानंतर माशांच्या मायटोकॉन्ड्रियावर ब्लु लाईटचा परिणाम तपासण्यात आला.  संशोधनानुसार, ब्लु लाईटचा केवळ माशांच्या डोळ्यांवरच वाईट परिणाम होत नव्हता, तर त्यांच्या त्वचेच्या पेशीही खराब होत होत्या.मोबाईलमधील ब्लु लाईटमुळे डोळ्यांसोबतच तुमच्या त्वचेचेही नुकसान होते, असे संशोधनातून समोर आलय. (side effects of mobile using)


ब्लु लाईट आणि स्कीनचा संबंध
फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणारा ब्लु लाईट त्वचेच्या पेशींमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो, जसे की त्वचेच्या पेशी कमी होऊ शकतात किंवा काहीवेळा या पेशी नष्टही होऊ शकतात, हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.  पेशींमधील हे बदल तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे बनवू शकतात.


संशोधनानुसार, जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ ब्लु लाईटच्या संपर्कात असाल तर ते तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये बदल करू लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेवर काळे डागही पडतात.  जास्त ब्लु लाईटच्या संपर्कात आल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, सूज आणि कोरडेपणा येऊ शकतो.