वर्कआऊटबरोबरच फिटनेससाठी या `५` गोष्टी करा!
जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा परिणाम दिसत नाही?
मुंबई : जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा परिणाम दिसत नाही? याचा अर्थ तुम्हाला वर्कआऊटचा पूर्ण फायदा मिळत नाहीये. वर्कआऊट केले म्हणजे आपण फिट आहोत, असे साधारणपणे अनेकांना वाटते. पण हे खरे नाही. फिट राहण्यासाठी तुम्हाला वर्कआऊट करण्यासोबतच या ५ गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
स्ट्रेचिंग
हेव्ही एक्सरसाईज केल्यानंतर स्ट्रेचिंग न केल्यास बॉडी मुव्हमेंटमध्ये थोड्या मर्यादा येतात किंवा ईजा होण्याची शक्यता वाढते. वर्कआऊटनंतरही शरीर लवचिक राहावे, यासाठी ८-१० मिनिटे स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे.
शांत झोप
झोपलेलो असताना आपले शरीर रिकव्हर होत असते. यासाठी फिट राहण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप अतिशय गरजेची आहे. अन्यथा पूर्ण दिवस थकल्यासारखे वाटते.
हायड्रेट
एक्सरसाईजनंतर शरीरातून खूप घाम येत असतो. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण कमी होते. त्यासाठी एक्सरसाईजनंतर शरीर हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
बॉडी पोश्चर
तासंतास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने शरीराचा शेप बिघडू लागतो. यासाठी बसल्या जागीच कमीत कमी ५० सेकंद बॉडी मुव्ह करा. त्यामुळे शरीरात रक्तसंचार सुरळीत होईल आणि बॉडी पोश्चरही नीट राहील.
हेल्दी डाएट
एक्सरसाईजनंतर भूक लागते. पण अशावेळी फॅट्सयुक्त आहार घेणे टाळा. अन्यथा वर्कआउटचा काहीही फायदा मिळणार नाही. कारण फॅट्समुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी पोषण अन्न घेणे, अत्यंत गरजेचे आहे.