मुंबई : काही लोकांना जेवण झाल्यानंतर उलटी किंवा मळमळीचा त्रास होतो. जर हा त्रास गरोदरपणात होत असेल तर तो फार सामान्य मानला जातो. पण जर इतरांना हा त्रास होत असेल तर हे हे खूप धोकादायक सिद्ध होऊ शकतं. कारण असं होणं हे काही गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर या समस्येला कसं दूर करायचं याबाबत आज सांगणार आहोत.


खाल्ल्यानंतर उल्टी होण्याची कारणं


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जर तुम्हाला खाल्ल्यानंतर उलटी झाल्यासारखं वाटत असेल तर त्याचं कारण असं आहे की, ज्या वेगाने पाहिजे तितक्या वेगाने पचनासाठी पुढे जात नाही. अशा परिस्थितीत ऍसिड रिफ्लक्स तयार होतो आणि खाल्ल्यानंतर उलट्या होतात.

  • जेवण जेवल्यानंतर उलट्या होण्याचं कारण अॅसिडिटी देखील असू शकतं. जेवणात तुम्ही अशा अनेक गोष्टी खाता, ज्यामुळे पोटात अॅसिड तयार होऊ लागतें. परिणामी उलट्या होण्याची शक्यता वाढते.

  • शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा काविळ झाल्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि उलट्या होतात.

  • लिव्हर आणि किडनीसंबंधी समस्या असेल तरीही खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास होऊ शकतो.


उल्टीची समस्या कशी टाळावी


  • कमी तळलेलं आणि मसालेदार अन्न खाणं टाळा.

  • रिकाम्या पोटी अन्न खाऊ नका.

  • कॅफेनयुक्त पदार्थ जेवणासोबत घेऊ नका.

  • जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नका.

  • अन्न खाल्ल्यानंतर हलका व्यायाम करा.