Health Tips in Martahi : दररोज सकाळी लवकर किंवा नियोजित वेळेवर उठणे हे आपल्यापैकी अनेकांसाठी कठीण काम असते. कितीही आसर्म लावा किंवा इतर उपाय केले तरी बरेच लोक सकाळी लवकर उठणं शक्य होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रात्रीची झोप पूर्ण होत नाही, यामागाचं मुख्य कारण असलं तरी बरेचदा प्रयत्न करुनही वेळेत जाग येत नाही. तुम्हालाही अशाच समस्येला सामारे जावं लागत असेल तर वेळीच सावध व्हा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली असणं देखील गरजेचे आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, आपल्या बैठी जीवनशैलीमुळे आपल्याला छातीत जळजळ होते. याचे दुसरे कारण म्हणजे तणाव. तसेच आजकालच्या व्यस्त जीवनामुळे  बहुतेक लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. ज्यामुळे त्यांच्यावर ताण येतो.  काही लोक मध्यरात्रीपर्यंत जागे राहतात आणि काम करतात तर काही लोक रात्री जास्त वेळ झोपत नाहीत. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे अनेक आजारांचे आपण बळी पडू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उशिरा उठल्यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घ्या... 


लठ्ठपणा


ज्या लोकांना सकाळी उशीरा उठण्याची सवय आहे, त्यांची चयापचय मंद होते. यामुळे लोकांना कॅलरी बर्न करण्यात अडचण येते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या सुरू होते.


पचन समस्या


जर तुम्ही सकाळी उशिरा उठ असाल तर तुमची पचनशक्ती मंद होऊ शकते. यामुळे आम्लपित्त, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हा त्रास वाढल्यास मुळव्याध होण्याचा धोका असतो. जे लोक सकाळी उशीरा उठतात त्यांना पचनाच्या समस्या जास्त असतात.


हृदयरोग


रात्री जाग राहून सकाळी उशीरा उठल्यामुळे सकाळचा सुर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. त्यामुळे रक्तदाबाची पातळी आणि वाईट कोलेस्टेरॉलची पातळी (हृदयरोग) वाढते. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.


मधुमेह


उच्च रक्तातील साखर हा देखील वाईट जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. जर तुम्ही रात्री जागे राहून सकाळी उशीरा उठला तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे भुकेशी संबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे लोकांचा आहार संतुलित राहत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो.