शहर असो किंवा गावं उन्हाळा म्हटलं की आपली पाऊलं आपसुकच रसवंतीगृहाकडे वळतात. उन्हाळाचा तडाख्यात थंडगार उसाचा आपल्याला दिलासा देतो. सहज आणि कमी किंमत एक ग्लास उसाचा रस हा प्रत्येकाला परवडतो. त्यामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहांवर लोकांची गर्दी पाहिला मिळते. पण उसाचा रस हा उष्ण वातावरणात कधीही पिणं योग्य नाही असं तज्ज्ञ सांगतात. तुम्ही देखील कुठल्याही वेळी उसाचा रस पिता मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (Do you drink sugarcane juice while standing on Rasvanti Drinking at this time can be expensive)


उसाचा रस कधी प्यावा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उसाचा रस हा आरोग्यासाठी चांगला असला तरी तो तुम्ही कुठल्या वेळी पित आहे, यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या वेळी उसाचा रस प्यायल्यास आरोग्याचे नुकसान होते. मग उसाचा रस कधी प्यावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर. तज्ज्ञ सांगतात की, सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणादरम्यान तुम्ही उसाचा रसाचं सेवन करावं. 


हेसुद्धा वाचा - नारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...


जेवल्यानंतर उसाच रस प्यायल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. खरं तर अन्न सेवन केल्यानंतर उसाचा रस प्यायल्यास अन्नात मिळणारं कार्बोहायड्रेट आणि उसाच्या रसातील साखर एकत्र होते आणि तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. 


रिकाम्या पोटी उसाचा रस प्या


उसाचा रस पिण्याची उत्तम वेळ ही सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरतं, असं तज्ज्ञ सांगतात. यामागे कारण असं आहे की, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाण उसाच्या रसात आढळतं. तसंच हे अनेक अँटिऑक्सिडंट्सचे घर मानलं जातं. जे जळजळ कमी करण्यात आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करण्यास मदतगार ठरतं. 


या सर्वांशिवाय उसाचा रस हा लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्याने सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि शरीरातील विषारी द्रव्ये मूत्रासोबत बाहेर टाकण्यास मदत मिळते. या सर्व व्यतिरिक्त, यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)