Diabetes Symptoms and Causes News in Marathi : भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य तज्ञांचे मते मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत. बदलती जीवनशैली आणि अनहेल्दी आहार यामुळे मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वर्षांपूर्वी हा आजार वृद्धांना होणारा आजार म्हणून ओळखला जायचा, मात्र तीच लक्षणे आता तरुणांमध्ये दिसून येत आहेत. केवळ वृद्ध आणि तरुणच नव्हे तर लहान मुलांनाही याचा त्रास होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेळीच या आजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर तो इतर अनेक गंभीर आजारांनाही जन्म देऊ शकते. भारतात सुमारे 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि 2045 पर्यंत ही संख्या 134 मिलियनपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.  मधुमेह हा आजार अचानक होत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. याचे काही संकेत  फार पूर्वीपासून मिळतात. यावेळी खूप तहान लागणे, थकवा येणे, वारंवार शौचालया जाणे, अचानक वजन कमी होणे, जास्त भूक लागणे, पाय किंवा हाताला मुंग्या येणे असे वाटू शकते. मधुमेह होण्यापूर्वी ही लक्षणे जाणवतात. 


साधारणपणे मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढणे याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत राहिल्याने कालांतराने शरीरावर विपरित परिणाम दिसून येतात. याव्यतिरिक्त, हायपोग्लाइसेमिया किंवा रक्तातील ग्लुकोजमध्ये लक्षणीय घट आहे. त्याचे तात्काळ परिणाम शरीरावर दिसून येतात. काहीवेळा ते जीवघेणेही ठरु शकतात. त्याकरता त्याची लक्षणे जाणून घेतली पाहिजेत. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं तर काही काळानंतर किडनी, डोळे आणि हृदयाचे कार्य बाधि होते. मात्र साखरेची कमतरता होताच, चिडचिड, अस्वस्थता, घाम येणं, प्रचंड भूक लागणं, मूड बदलणे यांसारखी लक्षणे दिसतात. अशा स्थितीत शरीरातील साखरेची पातळी लगेच वाढते. अन्यथा कोमात जाणं, फिट्स येणं असे गंभीर परिणाम होऊ शकतात.


औषधांशिवाय मधुमेहवर करा उपचार


तुम्हाला मधुमेहाची लक्षणे आढळल्यास, तुम्ही ताबडतोब तपासणी करून घ्यावी कारण तुम्हाला प्री-मधुमेहाची लक्षणे आढळल्यास, तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी तुम्हाला औषधांची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत मधुमेहाची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तपासणी करून घ्या, जेणेकरून मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल.


तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर या चुका करु नये 


- सर्वप्रथम साखर घेऊ नका. आपल्या आहारातून साखरेसह बनवलेल्या गोष्टी काढून टाका. त्याऐवजी तुम्ही फळे, गूळ किंवा मध यापासून नैसर्गिक साखर घेऊ शकता.


- जर तुम्हाला प्री-मधुमेहाची लक्षणे असतील तर तुम्ही योग करू शकता. कारण स्वादुपिंडाच्य चांगल्या कार्यासाठी योग हा एक चांगला पर्याय आहे.


- चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. प्रत्येकाला माहित आहे की प्री-डायबिटीज लोकांनी 7-8 दिवस तासांची चांगली झोप घेतली पाहिजे. 


- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच, चांगली झोप शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करते आणि हार्मोन्स देखील निरोगी ठेवते.


- योग्य वेळी अन्न खाणे तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही प्री-मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला जेवणाच्या अंतरावर विशेष लक्ष द्यावे लागेल. 


 


 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)