मुंबई : आपल्याकडे मुख्यता दोन प्रकारचं अन्न खाणारे लोक आढळतात. एक तर मांसाहारी आणि दुसरे शाकाहारी. काही लोकं जन्मापासूनच शाकाहारी किंवा मासाहारी असतात, तर काही लोकं आपल्या मर्जीप्रमाणे हे स्वीकारतात. मासाहारी लोकं मांसाचे कोणतेही पदार्थ मोठ्या आवडीने खातात. परंतु त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अलीकडे, बरीच प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये असे सांगितले जात आहे ती, अनेक लोकांना मांसाची अ‍ॅलर्जी आहे, परंतु ते लहानपणापासून ते खात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हीही यापूर्वी मांसाहारामुळे अ‍ॅलर्जी होत असल्याचे क्वचितच ऐकले असेल. तुम्ही डॉक्टरांकडून देखील असे कधी ऐकले नसेल, पण आता त्यांनी ते सिद्ध केले आहे. दीर्घ संशोधनानंतर, हे स्पष्ट झाले आहे की, मांसाहारामुळे अ‍ॅलर्जी देखील होते आणि त्याची कारणे देखील समोर आली आहेत.


अमेरिकेत, अशी काही प्रकरणे डॉक्टरांकडे आली, ज्यात असे म्हटले जात होते की, काही लोकांना नॉनवेज खाल्ल्यानंतर अ‍ॅलर्जीची लक्षणे जाणवत आहेत. सुरूवातीला जेव्हा हे लोकं तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आले, तेव्हा त्यांना सुद्धा ही लक्षणे आधी समजत नव्हती, पण नंतर असे आढळून आले की, मांसाहारामुळे त्यांना या समस्या येत आहेत. अशा परिस्थितीत, जाणून घ्या ही अ‍ॅलर्जी होण्याची कारणे कोणती आहेत.


अ‍ॅलर्जी का होते?


सुरुवातीला डॉक्टरांनी मांसाची अ‍ॅलर्जी होते स्वीकारली नाही, परंतु नंतर त्यांना याबद्दल समजले. DW च्या अहवालानुसार, एक प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर देखील या प्रकरणाबद्दल आश्चर्यचकित झाले. अहवालात सांगण्यात आले की, डॉक्टर म्हणतात, 'रुग्ण आधी मांस खात असत आणि नंतर त्यांच्या शरीरात एक प्रतिक्रिया होते, ज्याला काहीच अर्थ नाही. पण, दुसर्‍या एका प्रकरणात, तपासादरम्यान ऍन्टी-बॉडिजचा एल्फागल नावाचा एक छोटा कण सापडला.


अहवालात असे सांगण्यात आले आहे की, एल्फागल केवळ औषधांमध्येच वापरला जात नाही, तर त्याचा वापर प्राण्यांच्या मांसामध्येही केला जातो. हे उघड झाले की, मांसामुळे अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत असे होऊ शकते की, जर तुम्ही असे मांस खाल्ले तर तुम्हाला ही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता आहे.


तसे पाहाता सध्यातरी अशा प्रकारची प्रकरणे अमेरिकेच्या भागात अधिक पाहायला मिळत आहेत, जिथे बेडबगसारखे दिसणारे अळी आढळते आणि यामुळे अ‍ॅलर्जीची शक्यता अधिक वाढते. असे म्हटले जाते की, एल्फागल या अळीच्या मदतीने देखील मानवी शरीरात जाते, ज्यामुळे अ‍ॅलर्जीची शक्यता वाढते, त्यामुळे आता तरी भारतीयांना घाबरण्याची गरजही नाही.