मुंबई : डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी आयड्रॉप वापरणारे हे चांगलं जाणतात की, डोळ्यात आयड्रॉप टाकणे सोपं काम नाही तर एक आर्ट आहे. नेहमीच आयड्रॉप टाकताना जास्त लिक्विड निघतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे डोळ्यात कमी आणि चेह-यावर जास्त पसरतं. मात्र आयड्रॉप वापरणा-या अनेकांना हे माहिती नसतं की, आयड्रॉपच्या बॉटलचं डिझाईन मुद्दाम जास्त लिक्विड बाहेर यावं यासाठीच केलं जातं. 


प्रोपब्लिकाच्या एका रिपोर्टनुसार, आयड्रॉप डोळ्यातून ओव्हरफ्लो व्हायला लागतो. कारण ड्रॉपची साईझ मोठी असते आणि डोळ्यात तेवढंच लिक्विड थांबतं जेवढं डोळ्यात मावेल. खरंतर असा दावा करण्यात आलाय की, कंपन्या मुद्दामहून ड्रॉपची साईझ मोठी ठेवतात. जेणेकरून जास्त लिक्विड वाया जावं. आणि मग आयड्रॉप वापरणारे तो ड्रॉप पुन्हा खरेदी करतील. 


फाइजर मेमो २०११ च्या नुसार, मनुष्यांचे डोळे ७यूएल इतकंच लिक्विड शोषूण घेऊ शकतात. २००६ मध्ये एका अभ्यासातून समोत आलंय की, डोळ्यांसाठी मेडिसीन ड्रॉपची साईझ १५यूएल असायला पाहिजे. पण प्रत्यक्षात आयड्रॉपची साईझ २५यूएल ते ५६यूएल इतकी असते. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक औषध वाया जातं आणि तुमचा खर्च वाढतो.