कढीपत्ता स्वयंपाकातच नाही तर त्याचं पाणी करून... आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
कढीपत्त्यासोबत त्याच्या पाण्याचेही आहेतत हे गुणकारी फायदे
यशवंत साळवे, झी मीडिया, मुंबई : Health News : तुम्ही कढीपत्त्याचा वापर स्वयंपाकात केला असेल, सकाळी चघळला असेल, त्वचेची काळजी आणि केसांची काळजी घेण्यासाठीही वापरला असेल, पण तुम्ही कधी कढीपत्त्याचे पाणी पिताना पाहिले आहे का? नसेल तर आता जाणून घ्या कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे फायदे. खरं तर, कढीपत्त्यात शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट आढळतात जे आरोग्यासाठी चांगले असतात. यासोबतच या पानांना आयुर्वेदात औषधी दर्जा दिला आहे. जाणून घ्या कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत. (Do you know the health benefits of curry leaves latest marathi health News)
कढीपत्त्याचे पाणी कसे बनवावं
कढीपत्ता पाणी बनवण्यासाठी एका ग्लास पाण्यात मूठभर कढीपत्ता उकळवा. हे पाणी हलकेच कोमट करून डिटॉक्स वॉटर म्हणून प्या किंवा कपमध्ये काढून गरम चहासारखे प्या. हे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे आहेत.
पचनासाठी चांगले
आयुर्वेदात कढीपत्ता पचनासाठी उत्तम असल्याचे सांगितले आहे. यात काहींना जुलाब देखील होतात जे पोटासाठी चांगले असतात. विशेषत: हे पाणी अतिसार, गॅस आणि बद्धकोष्ठतेसाठी खूप चांगले आहे.
डिटॉक्स करण्यासाठी
कढीपत्त्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी प्यावे. सणानंतर जर तुम्हाला जड वाटू लागले आणि शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढले आहे असे वाटत असेल तर कढीपत्त्याचे पाणी प्यावे. अँटी-ऑक्सिडेंट्समध्ये कढीपत्ता समृद्ध असल्याने, ते शरीराला संक्रमण आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते जे त्वचेच्या पेशींना नुकसान करतात.
वजन कमी करण्यासाठी
कढीपत्त्याचे पाणी वजन कमी करणारे पाणी म्हणून पिऊ शकतो. हे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कढीपत्त्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त, तुम्ही ताजा कढीपत्ता सॅलडमध्ये घालून देखील खाऊ शकता. याशिवाय कढीपत्त्याचे पाणी थोडे व्यायाम करून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल, ज्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसून येईल.
ताण कमी करण्यासाठी
कढीपत्त्याच्या पाण्याचा परिणाम तणाव कमी करण्यावरही दिसून येतो. हे पाणी मज्जातंतूंना शांत करते, ज्यामुळे तणाव नियंत्रणात येतो. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे प्रत्येक गोष्टीचे टेन्शन घेऊ लागतात, तर तुम्ही कढीपत्त्याचे पाणी हर्बल चहा म्हणून पिऊ शकता.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्टी करत नाही.)