प्रत्येक वेळेस केस कापण्यापूर्वी धुणं गरजेचेच असते का ?
तुम्ही सलोनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तुमचे केस धुतले जातात का ? खरंच हेअर कट पूर्वी केस ओले करणे गरजेचे आहे का ?
मुंबई : तुम्ही सलोनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तुमचे केस धुतले जातात का ? खरंच हेअर कट पूर्वी केस ओले करणे गरजेचे आहे का ?
सुके केसही कापले जाऊ शकतात
तुमच्या केसांना नॅचरली कर्ल किंवा व्हेवी लूक द्यायाचा असेल तर त्यासाठी शुष्क केस अधिक फायदेशीर ठरतात. शुष्क केस ट्रीम केल्यास कर्ल पॅटर्न करण्यासाठी अधिक मदत होते.
एका बाजूचे केस अधिक जाडसर असतील तर अशा वेळेस शुष्क केसांमुळे ते कापणं अधिक सुकर होते.
तसेच ते कापल्यानंतर फॉल कसा पडतो हे पाहणं अधिक सोप्प होते.
केस कापण्यासाठी ओले कधी करावे लागतात ?
सार्या केसांची लेन्थ एकाच प्रकाराची ठेवायाची असेल तर ते ओले केले जातात. केस ओले करून त्यावरील धूळ कमी करता येऊ शकते. ओल्या केसांमुळे त्याची लेन्थ चुकत नाही.