मुंबई : जगभरातील लोक डायबिटीजच्या समस्येपासून त्रस्त आहेत. या आजाराला घेऊन प्रत्येकाची वेगवेगळी अशी धारणा आहे. काहींना वाटत की गोड पदार्थ खाऊन डायबिटीज होतो. यामुळे अशी मंडळी गोड पदार्थांपासून दूर पळतात. जास्त गोड खाऊ नको डायबिटीज होईल असंही अनेकजण सांगत असतात. पण तुम्हाला माहितेय का गोड खाऊन कधी डायबिटीज होत नाही. जर तुम्ही डायबिटीजच्या भितीमुळे गोड खाण टाळत असाल तर तुम्हाला हे वाचणं गरजेच आहे. गोड खाणं हे डायबिटीजचं कारण होत नसल्याचं नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून समोर आलंय. डायबिटीज होण्याच कारण काही वेगळी आहेत. फळ आणि डेअरी उत्पादनांमध्ये नैसर्गिक साखर असते. हे पदार्थ थेट खाल्ल्यास किंवा ज्यूस, जेवणात मिक्स करुन फळ अथवा डेअरी पदार्थ खाल्ल्यास डायबेटीज होण्याची भिती जास्त असते. या रिसर्चनुसार साखरेने बनलेले पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण असलेले  पदार्थ खाणं नुकसानदायक नसल्याचेही संशोधनातून समोर आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अनुसार, एक मनुष्य दिवसातून ६ चमचे साखर खाऊ शकतो. 


उपयुक्त भेंडी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी अर्धीकच्ची भेंड्याची भाजी खावी. गुजरातमधील हर्बल तज्ञांनुसार ताजी हिरवी भेंडी डायबिटीजसाठी खूप लाभदायक असते. भेंडींच्या बियांची पावडर ( 5 ग्राम), वेलची ( 5 ग्राम), दालचिनीच्या सालेची पावडर ( 3 ग्राम) आणि काळी मिरी (5 दाने) एकत्र करुन त्यांची पावडर बनवावी.  या मिश्रणाला नेहमी दिवसातून 3 वेळा कोमट पाण्यातून प्यावे. याने खूप फरक पडतो. 
काही वेळा भेंडी कापून रात्रभर पाण्यात ठेवल्या जातात. सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायले जाते. भेंडीच्या बिया एकत्र करा. त्यांना कोरड्या करुन त्याची पावडर तयार करा. त्या बिया प्रोटीनयुक्त असतात. चांगल्या आरोग्यासाठी ही उपयुक्त ठरतात. हे चूर्ण लहान मुलांना दिल्याने ते टॉनिकसारखे काम करते. 


 ( या संशोधनाशी २४तास.कॉम सहमत असेलच असे नाही. )