Weight Loss Tips In Marathi : लग्नासाठी महिनाच राहिला, एखाद्या कार्यक्रमाला जायचं वजन तर जास्त आहे आणि कार्यक्रमाला स्लिम ट्रिमही दिसायचं आहे. आता काय करायचं? कसं होणार वजन कमी? असा प्रश्न तुम्हाला अनेकवेळा पडला असेल. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे सल्ले सुद्धा देत असतात. पण वजन कमी करण्यासाठी सुरुवात कधी आणि कशी करायची याला वेळच मिळत नाही. काही कारणांस्तव राहूनच जाते. किंवा एक-दोन आपण प्रयत्न करतो त्यानंकर कंटाळा केला जातो.. पण तुम्हाला माहितीय का? काही छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत नेमके कोणचे बदल केले पाहिजेत... (want to Weight Loss Then take a enough sleep)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीची जीवनशैली, ताणतणाव आदींमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. अर्धवट झोपेमुळे कामावर लक्षही लागत नाही. मात्र आता अर्धवट झोपेचे परिणाम पाहून तुम्हाला झोपेचे महत्त्व कळेल. जर तुमची पुरेशी झोप किंवा कमी झोपेमुळे तुमचे वजन वाढू शकते. काही जण वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतात पण रात्री  उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठून नियमित कामाला लागतात. मात्र याच दिनचर्येमुळे तुम्ही जिममध्ये गेलात तरी तुमचे वजन कमी होणार नाही. या उलट वजन वेगाने वाढेल...


रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास तणाव आणि उच्च रक्तदाब (High blood pressure) यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. झोप आणि वजन वाढणे याचा आपल्या शरीरातील हार्मोन्सशी जवळचा संबंध आहे. रात्रीची झोप शरीरातील हार्मोन्स संतुलित करते. याचा अर्थ झोपेत शरीरातील कोर्टिसोल हार्मोन्सची कमतरता असते. त्यामुळे शरीरात इतरही हार्मोन्स रिलीज होतात. 


वाचा : सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?


झोप आणि वजन कमी होणे या दोन्ही गोष्टी हार्मोन्सच्या (hormones) संतुलनाशी संबंधित आहेत. यामधील पहिला हार्मोन म्हणजे ग्रेलिन. हा हार्मोन भूकेचा हार्मोन म्हणून ओळखला जातो. म्हणजे भूक लागल्याची जाणीव होते. रात्री झोपेत असताना शरीर या हार्मोन्सचे प्रमाण कमी करते. जेणेकरून रात्री भूक लागणार नाही. दुसरा हार्मोन लेप्टिन आहे. या हार्मोन्समुळे झोप वाढते. शरीरात याचे प्रमाण वाढल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. 


जर दोन हार्मोन्सला पुरेशी झोप मिळाली तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर कमी खाल. या संपूर्ण प्रक्रियेमुळे तुमचा लठ्ठपणा कमी होतो. म्हणजेच, जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर तुम्हाला दिवसभर भूक लागते आणि तुमची भूक वाढतच राहते. यामुळे तुम्ही जास्त खाता आणि परिणामी वजन वाढते.


तसेच, पुरेशी झोप न मिळाल्याने तुमचा चयापचया वेग मंदावतो. ज्यामुळे तुमच्या शरीराची कॅलरी ऊर्जेत रूपांतरित करण्याची क्षमता कमी होईल. अशातच फॅट तुमच्या शरीरात जमा होण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर वजन वाढण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.