स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या घ्या डॉक्टरांचा सल्ला...
दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी एक नवीन अॅप विकसित केले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी एक नवीन अॅप विकसित केले आहे. ‘मायफॉलोअॅप’ असे या अॅप चे नाव असून यामध्ये रुग्ण आपले क्लिनिकल रिपोर्ट अपलोड करू शकतात. आणि ते रिपोर्टस बघून डॉक्टर तुम्हाला माफक दरात सल्ला देतील.
तुम्ही कोठेही असा डॉक्टरांच्या सल्लासाठी तुम्हाला दिल्लीला येण्याची गरज नाही. अॅपच्या माध्यमातून डॉक्टर काही क्षणात आजारावर उपाय सुचवतील. त्यामुळे डॉक्टरांच्या भेटीसाठी लागणार वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. मात्र यासाठी तुम्हाला कमीत कमी एकदा तरी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.
गंगाराम हॉस्पिटलच्या डिपोर्टमेंट आॅफ मिनिमल एक्सेस एंड बारियाट्रिक सर्जरी सेंटर चे चेअरमन डॉ. सुधीर कल्हानने सांगितले की, "डॉक्टर आणि पेशंट मध्ये विश्वासाचे नाते असते. तसंच आम्हांला निदान करण्यासाठी पेशंटचा इतिहास माहित असणे गरजेचे आहे."
कल्हानने सांगितले की, "आमच्याकडे अशाप्रकारे सर्जरी करण्यासाठी देशातील विभिन्न ठिकाणांहून लोक येतात. मात्र त्यानंतर त्यांना वारंवार डॉक्टरांना भेटायला ऐंशी गरज भासणार नाही." आतापर्यंत १०००० युजर्सने हे अॅप डाऊनलोड केले आहे.
सर गंगाराम हॉस्पिटलच्या २०० हून अधिक तज्ञ ऑनलाईन अप्वाइंमेंटसाठी उपलब्ध आहेत.