लंडन : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगभरात थैमान घातला होता. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे तज्ज्ञांची चिंताही वाढली. दरम्यान कोरोनाच्या या सर्व बातम्यांदरम्यान एक धक्कादायक अभ्यास समोर आलाय. या अभ्यासात कोरोनाचा स्पर्म काऊंटवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या रूग्णांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा इतकाच धोकादायक आहे. तर फर्टिलिटी आणि स्टेरिलिटीमध्ये छापण्यात आलेल्या अभ्यासानुसार, हा व्हायरस आणि पुरुष प्रजनन क्षमता यांच्यामध्ये संबंध आहे. पुरुषांच्या स्पर्म काऊंटवर कोरोनाचा दीर्घकाळ प्रभाव पडतो.


संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, पुरुषांमधील स्पर्मची संख्या कमी करण्यासाठी कोरोना जबाबदार आहे. संशोधकांना आढळून आलं आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुरुषांच्या स्पर्मची क्वालिटी अनेक महिने खराब राहते. 


संशोधकांना असंही आढळून आलंय की, सीमन म्हणजेच वीर्य जास्त संसर्गजन्य नव्हते. कोरोनामधून मुक्त झाल्यानंतर महिनाभरात 35 पुरुषांच्या नमुन्याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये स्पर्म काऊंट 37 टक्क्यांनी कमी झाली आहे.


दरम्यान बाळाचा विचार करणाऱ्या जोडप्यांना संशोधकांनी इशारा दिला आहे. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड-19 संसर्गानंतर शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.