मुंबई : आजकाल धावपळीच्या झालेल्या जीवनशैलीमुळे आपल्या लहानसहान गोष्टींचाही आरोग्यावर परिणाम होतो. स्टाईलच्या नादामध्ये आपण काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे भविष्यात अनेक दुखणी वाढतात. अशापैकी एक सर्वायकल पेन.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्दीतून प्रवास करताना अनेकदा महिला घट्ट आंबाडा बांधून बाहेर पडतात. दिवसभर 8-10 तास बाहेर असल्याने तो आंबाडा मानेवर तसच राहतो. अनेकदा आंबडा बांधल्याने मानदुखीचा त्रास होत असल्याची कुरबूर तुम्ही ऐकली असेल. पण  काय खरंच आंबाडा बांधल्याने सर्व्हायकल स्पॉंडेलिसिस किंवा सर्व्हायकल पेन वाढतं का? 


कशामुळे होतो सर्व्हायकल स्पॉडेलिसिसचा त्रास ? 


स्पॉडेलिसिसचा त्रास हा अर्थ्राईटीसचं एक रूप आहे. त्यामुळे पाठीच्या मणक्यात हाडांची होणारी असमान्य वाढ, वर्टेबमधील कुशनमध्ये कॅल्शियमचं होणारं डी जनरेशन किंवा त्यांची जागा सरकणं. नॅचरली असलेल्या त्यांच्या जागेमध्ये बदल झाल्यास या वेदना तीव्र होऊ शकतात. मानेपासून कंबरेपर्यंत या वेदना पसरतात. 


स्पॉन्डेलिसिस बळावण्याचं कारण 


कॅल्शियमची कमतरता 
पाण्याच्या कमतरतेमुळे डिस्क सुकतात, हळूहळू कमजोर होतात. 
गंभीर जखमेमुळेही मानेचे दुखणे बळावते 
धुम्रपानाची सवय
ताणतणाव, नैराश्य आणि चिंता 


हेवी कॉलरचा ड्रेस किंवा मोठा आंबाडा यामुळे मानेचे दुखणे वाढू शकते. पण यामुळे स्पॉडेलायसिसचा त्रास जडण्याची शक्यता कमी आहे.