मध किती काळ टिकून राहू शकतं ?
सर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे.
मुंबई : सर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे.
अनेक महिने मध न वापरता राहिल्यास ते खराब होते का ? मधाला देखील एक्सपायरी डेट असते का ? या तुमच्या मनातील प्रश्नांना शेफ गंगादीप सिंह यांनी उत्तरं दिली आहे.
तुम्ही वर्षभराचे किराणामालाचे सामान एकत्र भरता का ? मग या सामानांमध्ये मधाचा वापर करणं सोयीचे आहे. मध थंड ठिकाणी, सूर्यप्रकाशापासून दूर आणि हवाबंद डब्ब्यात ठेवल्यास ते नीट राहते.
मधामध्ये मॉईश्चर कमी प्रमाणात असते तसेच अॅसिडीक असल्याने दीर्घकाळ टिकते.
मध योग्य बाटलीत न साठवल्यास तसेच दमट वातावरणात ठेवल्यास त्यामध्ये मायक्रोऑर्गेनिझम व बॅक्टेरियाचीची वाढ होते. परिणामी मध खराब होते.
जर मध क्रिस्टलाईज्ड झाले असेल म्हणजेच त्यामध्ये खडे झाले असतील तर बाटली बाऊलभर गरम पाण्यात ठेवून बाहेर कढा. म्हणजे त्यामधील खडे वितळतील.
भेसळयुक्त मध कसे ओळखाल ?
मधाची चाचणी करणं अत्यंत सोपे आहे. थेंबभर मध तुमचा अंगठा आणि तर्जनीमध्ये चोळा. मध शुद्ध असेल तर ते त्वचेमध्ये झिरपते. उलट जर मध भेसळयुक्त असेल तर ते चोळताना तुम्हांला बोटांवर चिकट जाणवेल.