उन्हाळा सुरु झाला आहे आणि दुपारच्या वेळेस बाहेर पडलं की घामाघूम व्हायला पाहिजे. अशा दिवसात शरीराला थंडावा मिळावा तसंच थकवा दूर करण्यासाठी अनेकजण उसाचा रस पिणं पसंत करतात. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो की उसाच्या रसामध्ये कॅलरीज असतात का? तसंच यामध्ये साखरेचं प्रमाण असल्याने रक्तातील शुगर वाढू शकते का? यासाठी आपण आज जाणून घेऊया की उसाच्या रसामध्ये किती प्रमाणात कॅलरीज आणि साखर असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, उसाच्या रसात किती कॅलरीज आहेत आणि त्यामुळे वजन वाढू शकते का? त्यात साखरेचं प्रमाण किती आहे? शिवाय आरोग्यावर काही परिणाम होतो का? 


उसाच्या रसातील कॅलरीजचं प्रमाण


240 मिली. उसाच्या रसात 250 कॅलरी असतात. ज्यामध्ये 30 ग्रॅम नॅचरल शुगर असते. उसाच्या रसात कोलेस्ट्रॉल, फायबर, तसंच प्रोटीन याची मात्रा शून्य असते. मात्र यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसंच लोहं यांचा समावेश असतो.


उसाच्या रसामध्ये प्रत्येक ग्लासात 13 ग्रॅम आहारातील फायबर असतं, जे फायबरच्या दैनंदिन मूल्याच्या 52 टक्के असते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या मते, बहुतेक अमेरिकन लोकं दररोज फक्त 10 ते 15 ग्रॅम फायबर खातात, तर शिफारसीनुसार, दररोजंच सेवन 20 ते 35 ग्रॅम इतकं असतं.


उसाच्या रसामध्ये फॅट नसतं, परंतु त्यात 30 ग्रॅम साखरेचं प्रमाण असतं. उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते, कारण त्यातील फायबर काढून टाकलं जातं.