मुंबई : कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी लस हा एक प्रभावी उपाय मानला जातोय. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न आहे तो म्हणजे लसीमुळे किती बचाव होतो? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर कोणती लस घ्यावी असाही प्रश्न अजूनही मनात आहेत. दरम्यान यावर आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिलं आहे. जाणून घेऊ दोन डोस घेतल्यानंतर धोका कमी होतो का?


संशोधन काय सांगते ?


आरोग्य खात्याने एप्रिल आणि ऑगस्ट या काळातील डेटावरून संशोधन एक केलं आहे. यामध्ये दुसऱ्या लाटेत म्हणजेच एप्रिल ते मे या काळात मृत्यू झालेल्यांमध्ये एकही डोस न घेणऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक होते.


कोण सुरक्षित?


17.5 कोटी लोकांना आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सरकारच्या संशोधनाचा निष्कर्षानुसार, या 17.5 कोटी लोकांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका 97 टक्के कमी आहे. 56 कोटी लोकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यांनाही जवळपास 96 टक्के सुरक्षा मिळत आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक दिला गेला दुसरा डोस


दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं चिन्ह आहे. राज्यात 1.85 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर यामध्ये दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आहे. युपीमध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 1.45 कोटी आहे.