मुंबई : केसगळतीची अनेक कारणं आहेत. काही जणांना केसगळतीचा त्रास पोषक आहाराच या अभावामुळे होतो तर काही जणांमध्ये हा त्रास अनुवंशिक किंवा लाईफस्टाईलमधील काही चुकांमुळे बळावतो. केसगळतीबाबत अनेक समज - गैरसमज आहेत. अशापैकी एक म्हणजे हेल्मेटचा वापर केल्याने केसगळतीचा त्रास वाढतो. तुमच्या मनातील या प्रश्नाला एक्स्पर्टनी दिलेला खास सल्ला नक्की जाणून घ्या.   


 खरंच हेल्मेटच्या वापरामुळे केस गळतात का?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अनेकांना असे वाटते की, हेल्मेटच्या वापरामुळे केसांची मूळं श्वास घेऊ शकत नाहीत. ऑक्सिजनच्या अभावामुळे केस मूळांपासून कमजोर होतात परिणामी केसगळतीचा त्रास वाढतो. हेअर ट्रान्सप्लान्ट  एक्सपर्टच्या मते, केसांच्या मूळांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी बाहेरील हवेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. रक्तातूनच केसांच्या मूळांना आवश्यक ऑक्सिजन मिळतो.  


 हेल्मेटचा अतिवापर त्रासदायक  


 हेअर ट्रान्सप्लान्ट  एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, हेल्मेट अति घट्ट असल्यास त्याचा डोक्यातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. यामुळे केसगळतीचा त्रास वाढू शकतो. सोबतच हेल्मेट नीट स्वच्छ केलेले नसल्यास त्यामधून टाळूवर इंफेक्शन पसरू शकते. केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.  


 हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्ट्सचा खास सल्ला  


 हेल्मेट किंवा टोपी वापरताना त्याची स्वच्छता तपासून पाहणं आवश्यक आहे. त्यामधील अस्वच्छता केसांमध्ये अस्वच्छता पसरण्याचे कारण ठरू शकते. 
 
 हेल्मेट घाई-घाईत घालू किंवा काढू नका. असे केल्यास तुमचे केस तुटण्याची दाट शक्यता असते.