मुंबई : वजन वाढणं ही समस्या अनेकांना जाणवते. अतिरीक्त वजनामुळे अनेक शारीरिक समस्याही उद्भवतात. त्याचबरोबर अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे जर तुमचं वजन जास्त ते कमी करण्याचा प्रयत्न आतापासूनच सुरू करा. वजन कमी करण्यासाठी आवश्यक उपाय करा जेमेकरून निदान वजन वाढणं थांबेल आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन वाढण्यामध्ये रात्रीच्या जेवणाचा परिणाम जास्त खाण्याचा परिणाम होतो. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील अनेक प्रणाली मंदरित्या काम करतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या वेळी काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात आणू शकता.


खाली दिलेल्या गोष्टी नक्की टाळा


रात्रीचं जेवणं उशीराने


अनेक लोकं रात्रीचे जेवण उशिरा जेवतात. दिवसभराचं काम संपवून काहींना जेवायला उशीर होतो किंवा काही वेळा लोकांना उशिरा जेवण जेवायची सवय असते. अशा स्थितीत लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपतात. ही सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2-3 तास ​​आधी करावं, जेणेकरून तुमच्या पचनसंस्थेला अन्न पचायला पुरेसा वेळ मिळेल. 


गरजेपेक्षा जास्त खाणं


रात्रीचं जेवण नेहमी हलकं असावं असं तज्ज्ञ नेहमी सांगतात. रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला झोपायचं असतं. मुळात झोपताना शरीर जास्त अन्न पचवू शकत नाही. अशा स्थितीत तुम्ही जेऊन झोपता पण ते अन्न पचत नाही. त्यामुळे रात्री पोटभर जेवण करण्याऐवजी थोडे कमी जेवावं.


खाण्यामध्ये चुकीचे पदार्थ खाणं


रात्रीचे जेवण हलकं तर असावं त्याचसोबत ते आरोग्यदायीही असलं पाहिजे. रात्रीच्या जेवणात जंक फूड आणि खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. कारण या सर्व गोष्टीने वजनात वाढ होते. त्याऐवजी, हेल्दी होममेड फूड खा.


खाल्यानंतर शतपावली न करणं


दिवसा आणि रात्रीच्या मुख्य जेवणानंतर तुम्ही नेहमी थोडं चालायला हवं. दिवसा जेवल्यानंतर जर तुम्ही न चालता कामाला लागाल तर फारशी अडचण येणार नाही. पण रात्रीचं जेवण झाल्यावर थोडा वेळ नक्कीच चाललं पाहिजे. अन्न जेवल्यानंतर लगेच फेरफटका मारल्याने शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि वजन वाढत नाही. 


चांगली झोप न घेणं


वजन कमी करताना जेवणाची वेळ आणि खाद्यपदार्थांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच झोपंही महत्त्वाची आहे. रात्रीची 7 ते 9 तासांची झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला रात्री कमी झोप येत असेल किंवा सकाळी उशिरापर्यंत झोप येत असेल तर याचा परिणाम तुमच्या वजनावरही होतो.