मुंबई : भारतात सर्वात जास्त प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाच्या घोटाने होते. दरम्यान चहाचं सेवन हे हानिकारक मानलं जातं. यामध्ये चुकीच्या पद्धतीने चहा पिणं आणि अतिरीक्त प्रमाणात चहा प्यायल्यास तो नुकसानदायक ठरू शकतो. मात्र तरीही लोकांची चहाची चाहत काही सुटत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहितीये असे काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन केल्यानंतर चहा पिऊ नये असं म्हणतात. या पदार्थांचं सेवन करून जर तुम्ही चहा प्यायल्यास तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. जाणून घेऊया असे पदार्थ कोणते?


थंड गोष्टी


खूप जास्त थंड पदार्थ खाल्ल्यानंतर चूकूनही चहा पिऊ नये. असं केल्यास पचन तंत्रावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी काहीही थंड पदार्थ खाल्ल्यानंतर अर्धातास थांबून चहा प्यायला पाहिजे.


लिंबू


ज्या पदार्थांमध्ये लिंबाचं प्रमाण आहे अशा पदार्थांच्या सेवनानंतर तातडीने चहा पिऊ नये. काही लोकं वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू घालून पितात आणि त्यानंतर तातडीने चहा पितात. असं केल्यास पोटफुगी, एसिडीटी असे त्रास उद्भवू शकतात. 


बेसनचे पदार्थ


बेसनापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर चहा पिऊ नये. बेसनापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास पचनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बेसनापासून बनवलेले पकोडे चहासोबत खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.