मुंबई : अनेकांना चांगल्या आरोग्यासाठी दूध प्यायची सवय असते. अनेक जण मुलांना आग्रहाने दूध पाजता. पण दूध प्यायल्यानंतर त्याच्यावर कोणत्या गोष्टी खाऊ नये ही गोष्ट देखील माहित असणे आवश्यक आहे. जाणून घ्या कोणती ती गोष्ट आहे जी दुध पिण्याआधी किंवा प्यायल्यानंतर खाऊ नये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, विटामिन्स, मिनरल आणि इतर आवश्यक तत्व असतात. जे शरिरासाठी फायदेशीर असतात. दूध प्यायल्याने शरीरात शक्ती वाढते. याच्यामुळे हाडं मजबूत होतात. मांसपेशी देखील यामुळे मजबूत होतात. पण खूप लोकं दूध पितांना काही अशा चुका करतात की ज्यामुळे त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. य़ामुळे काही गंभीर आजार देखील होऊ शकतो. दूध प्यायल्यानंतर शरिरात गरम पडल्यानंतर गोष्टींचं सेवन करु नये. दुधामधील अँटीऑक्सिडेंट तत्व शरीराला थंड ठेवतात.


थंड आणि गरम वस्तू एकत्र सेवन करु नये. याचा शरिरावर गंभीर परिणाम होतो. दूध प्यायल्यानंतर किंवा पिण्याआधी मासे आणि मटण खाऊ नये. कारण यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. याच्या एकत्रित सेवनाने शरिरावर पांढरे डाग आणि पोटासंदर्भात आजार होऊ शकतात.