मुंबई : दह्यामध्ये असलेलं प्रोबायोटिक बॅक्टिरिया पोटसाठी फायदेशीर मानला जातो. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 12, मॅग्नेशिनयम तसंच पोटॅशियम असतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन असो किंवा अपचनाचा त्रास दह्याचं सेवन यासाठी फायदेशीर असतं. अनेकदा काहीतरी नवं म्हणून विविध पदार्थांसोबत दह्याचं सेवन केलं जातं. मात्र तुम्हाला माहितीये का असं कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दह्यासोबत या पदार्थांचं सेवन करू नका


दह्यासोबत कांद्याचं सेवन


कोशिंबीर बनवताना अनेकदा दह्यामध्ये कांद्याचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. दही आणि कांदा यांच्या मिश्रणाचा परिणाम विपरीत होऊ शकतो. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवण्याची समस्या असते.


दह्यासोबत साखर


दह्यासोबत साखरेचं कधीही सेवन करू नये. दही आणि साखर पचन प्रक्रियेसाठी कठीण असतं. जर तुम्हाला दह्यासोबत गोड हवं असल्यास तुम्ही गुळाचा वापर करू शकता. याशिवाय तुम्ही दह्यामध्ये मीठ घालून त्याचं सेवन करू शकता.


दही आणि आंबा


स्मूदीसाठी किंवा लस्सीसाठी आपण दह्यासोबत आंब्याचा वापर करतो. मात्र चुकूनही हे मिश्रणांचं सेवन करू नये. दे दोन्ही शरीरासाठी टॉक्सिक बनतं. यांच्या एकत्रित सेवनाने पचनाला त्रास होतो. तसंच यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.


दूध आणि दही


दूध आणि दह्याचंही एकत्रित सेवन करू नये. असं केल्याने एसिडिटी, गॅस, उल्टी या समस्या बळावतात. त्याचसोबत अपचनाच्या त्रासालाही सामोरं जावं लागतं.