मुंबई : अनेकांची सकाळी सकाळी एका चहाच्या घोटाने होते. तर काहीजण गरम चहासोबत बिस्कीट किंवा ब्रेड खाणं पसंत करतात. त्याचप्रमाणे पोहे, समोसे, ऑमलेट, फ्रूट ज्यूस असे देखील पदार्थ सकाळच्या नाश्तात पहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहितीये का? असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, काही पदार्थ उपाशी पोटी खाल्ल्याने आतड्यांचं नुकसान होतं. मुख्य म्हणजे आपलं पाचनतंत्र दीर्घकाळ झोपेनंतर त्याचं काम सुरु करतं. त्यामुळे त्याला काळी वेळ गरजेचं आहे. यासाठी झोपून उठल्यानंतर किमान 2 तासांनी ब्रेकफास्ट करावा.


मसालेदार पदार्थ


उपाशी पोटी मसालेदार पदार्थांचं सेवन केल्यास एसिडिक रिएक्शन होऊ शकते. शिवाय यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच सकाळी नाश्त्याच्या वेळी समोसा, कचोरी, पकोडे खाऊ नयेत.


कॉफी


अनेकांची सकाळची सुरुवात कॉफी घेतल्याशिवाय होतच नाही. मात्र उपाशी पोटी कॉफी पिऊ नये. यामुळे एसिडिटी होण्याची शक्यता असते.


दही


दह्यामध्ये लॅक्टिक असिज असतं. जे शरीरातील आम्लता पातळी बिघडवतं. शिवाय पोट रिकमी असल्यावर लॅक्टिक एसिड बॅक्टेरियाला मारून टाकतं, ज्यामुळे एसिडीटी वाढण्यास मदत होते. 


लिंबूवर्गीय फळं


फळं आरोग्यासाठी चांगली असतात आणि अनेकजण सकाळच्या नाश्त्याला फळं खाणं पसंत करतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उपाशी पोटी आंबट फळं खाऊ नयेत. यामुळे शरीरात एसिडचं प्रमाण वाढून त्रास होऊ शकतो.