मुंबई : जगभरातील अनेकांची सुरुवात ही चहाच्या कपाने होते. चहा प्यायल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटू लागते. जगभरात अनेक जण चहाचे चाहते आहेत. काही लोकांना दिवसात 3 वेळा चहा लागतो तर काहींना 5 वेळा. असं असलं तरी देखील चहा पित असताना काही गोष्टींची काळजी ही घेतलीच पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींना लोकांना चहासोबत बिस्किटे खायला आवडतात तर काहींना इतर वेगवेगळ्या गोष्टी. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या चहासोबत कधीही खाऊ नयेत. असे केल्यास आरोग्यासाठी समस्या तयार होऊ शकते.


1. ड्रायफ्रुट्स


दुधासोबत लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. नट्समध्ये भरपूर लोह असते, त्यामुळे चहासोबत नट खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे चहासोबत मेवे खाणे टाळा.


2. लोहयुक्त भाज्या


लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नयेत. कारण चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. त्यामुळे नट, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये, कडधान्ये असे लोहयुक्त पदार्थ चहासोबत टाळावेत.


3. लिंबू


फिटनेस जगात लिंबू चहा पिण्याची शिफारस केली जाते कारण काही लोकांचा असे वाटते की, यामुळे जलद वजन कमी होते. परंतु त्या लोकांना हे देखील माहित असले पाहिजे की चहामध्ये लिंबाचा रस मिसळून ते ऍसिडिक बनते आणि शरीरात जळजळ होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चहा प्यायल्यास अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे हा चहा पूर्णपणे टाळणे चांगले.


4. बेसन


पकोडे किंवा नमकीन सोबत चहा पिणे भारतात सामान्य आहे. आपल्यापैकी बहुतेकजण हे करतात. तज्ज्ञांचे मत आहे की चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचे चहासोबत कधीही सेवन करू नका.


5. हळद


चहा पिताना हळद असलेले पदार्थ टाळावेत कारण त्यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्याही होऊ शकतात. हळद आणि चहाची पाने एकमेकांशी सुसंगत नाहीत, म्हणून चहासोबत हळद असलेल्या गोष्टींचे सेवन करू नका.


6. थंड पदार्थ


गरम चहासोबत किंवा चहानंतर लगेच थंड पदार्थ कधीही खाऊ नका. असे केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याचे कारण असे की वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमकुवत होऊन मळमळ होऊ शकते. गरम चहा प्यायल्यानंतर, किमान 30 मिनिटे थंड काहीही खाणे टाळा.