मुंबई : अनेकदा फळं खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे की काही भाज्या तसंच फळं फ्रीजमध्ये ठेवणं हानिकारक आहे. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, आंबा, टरबूज, लीची आणि इतर हंगामी फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत. 


आंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबा आणि टरबूज यांचं उन्हाळ्यात अधिक सेवन केलं जातं. तज्ञांच्या मते, ही दोन फळं कमी तापमानात ठेवल्यास खराब होण्याचा धोका वाढतो. ही फळं कापूनही ठेवू नये. यामुळे या फळांचा रंग फिका होऊ लागतो आणि कापण्यामुळे बॅक्टेरिया त्याच्या पृष्ठभागावर वाढू लागतात.


लिची


उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या फ्रिजमध्ये लिची हे फळं दिसून येतं. लिचीला फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आतील फळं खराब होऊ लागतं.


लिंबू आणि आंबट फळं


आंबट फळांना जास्त दिवस फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेऊ नये. या फळांना जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्या सालावर काळे डाग येतात.


तज्ज्ञांच्या मते, खोलीचं तापमान टरबूज, खरबूज आणि आंबा या सर्व फळांसाठी योग्य असतं. ही फळं ताजी ठेवण्यासाठी काही काळ थंड पाण्यात ठेवा. आवश्यकता असल्यास खाण्यापूर्वी फळाला कापून फ्रिजमध्ये 10 ते 15 मिनिटे ठेवू शकता.