Exercises For Double Chin : आताची जीवनशैली पाहिली तर हालचाल ही अजिबात राहिली नाही. मात्र याचा परिणाम असा थेट आरोग्यावर होतो. ऑफिसमध्ये तासन तास एकाच खुर्चीवर बसायचं  त्यानंतर आरोग्यदायी खाणं नाही, फक्त फास्ट फूडवर सपाटून ताव मारायचा. अशा खाण्याने तुमचं वजनही वाढतं मात्र हे फक्त वजनच नाही वाढत तर तुमची चरबी कशीही वाढलेली दिसते. अशाच प्रकार काहींच्या हनवटी खालची चरबी वाढलेली असते. या चरबीमुळे तुमच्या चेहऱ्याला काही आकार राहत नाही आणि इम्प्रेशन पडत नाही. ही ज्यादाची चरबी कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काही असे व्यायाम आहेत ज्याने तुम्ही लवकरात लवकर ती चरबी घालवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी अनेक लोक मोठ मोठी सर्जरी देखील करतात, परंतु तुम्हाला माहितीये तुम्हाला यासाठी सर्जरी करण्याची आवशकता नाही, तुम्ही घरबसल्या किंवा अगदी काम करता करता चेहऱ्याचा योगा करु शकता, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फॅट्स किंवा डबल चीन कमी होईल.


बॅलून पोझ
तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात तोंड स्वच्छ करताना, जसे की, चुळ वैगरे भरण्यासाठी अशा पोझ दिल्या असतील. या व्यायामासाठी तोंडात जास्तीत जास्त हवा भरावी. नंतर, भरलेली हवा आत ठेवून, तोंड डावीकडे आणि उजवीकडे हलवा. असे दिवसातून ५ ते ७ वेळा केल्यास दुहेरी हनुवटी तर दूर होईलच पण जबड्याची हाडेही मजबूत होतील.



तुम्ही तुमची पाठ सरळ करून बसा. यानंतर तुमचा चेहरा वरच्या दिशेने स्ट्रेच करा. यानंतर चेहरा खाली आणा, हा व्यायाम 10 वेळा करा. 


हा व्यायाम खूप सोपा आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला पाठ सरळ करून खुर्चीवर बसावे लागेल, नंतर तुमचा उजवा हात डाव्या गालावर ठेवावा, त्यानंतर तुमची मान वाकवून चेहरा खाली ढकलण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या बाजूलाही असेच करा.


सिंह मुद्रा
या आसनात तुम्ही तुमची जीभ पूर्ण ताकदीने बाहेर काढा आणि तोंडात हवा भरून तुमची जीभ उजवीकडे आणि डावीकडे हलवा, असे केल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा घट्ट होईल आणि चेहऱ्याची अतिरिक्त चरबीही निघून जाईल. 



सरळ बसा तोंडात हवा भरा नंतर उजव्या आणि डाव्या बाजूला तोंडात आळीपाळीने हवा फुंकावी. तुम्हाला हे किमान 30 सेकंद करावे लागेल. हे तुमचे गाल स्लिम होण्यास मदत होते.